अभिषेक बच्चनचे चित्रपट आवडणाऱ्या लोकांचा एक वेगळाच प्रेक्षकवर्ग आहे. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर पैशाचा पाऊस पाडत नसतील पण लोकांच्या मनावर गारुड नक्कीच घालतात. आयएमडीबीवर हाय रेटिंग मिळालेले त्याचे ७ चित्रपट बघ्यालच हवेत.
धीरूभाई अंबानी यांच्या जीवनावर आधारित 'गुरु' या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.७ आहे. हा चित्रपट अनेकांचा आवडता चित्रपट आहे आणि अभिषेकचे त्यासाठी खूप कौतुक झाले.
कोरोना काळात नेटफ्लिक्सवर 'लुडो' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये अभिषेक बच्चनसोबत राजकुमार राव आणि सान्या मल्होत्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.६ आहे.
'सरकार' या चित्रपटात अभिषेकसोबत त्याचे वडील अमिताभ बच्चन यांनीही काम केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आहेत. या क्राइम थ्रिलर चित्रपटाचे रेटिंग ७.६ आहे.
मणिरत्न दिग्दर्शित 'युवा' या चित्रपटाचा आयएमडीबी स्कोअर ७.३ आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत विवेक ओबेरॉय आणि अजय देवगण देखील दिसले आहेत.
२०२२मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दसवी' चित्रपटात अभिषेकसोबत निमृत कौर आणि यामी गौतम आहेत. चित्रपटाचे IMDb रेटिंग ७.४ आहे.
या चित्रपटातही अभिषेकचे वडील अमिताभ बच्चन यांनी त्याच्यासोबत काम केले आहे. यात अभिनेत्री विद्या बालन मुख्य भूमिकेत झळकली आहे. या चित्रपटात अभिषेक बिग बींच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन यांना अनुवांशिक आजार झाल्याचे दाखवण्यात आले आहे, ज्यामुळे ते बालपणातच म्हातारे दिसू लागतात.