(4 / 5)पुढे अभिजीत म्हणाला, 'मी याआधी कॉर्पोरेटमध्ये काम केले आहे. त्यामुळे मला माहित होते की, हे खूप चुकीचे आहे. पण या क्षेत्रांच्या नियमांनुसार जे काही आहे, त्यामध्ये चांगल्या पद्धतीचे जेवण आले, चांगली वागणूक आली. पण या सगळ्या गोष्टी देण्यात आल्याच नाहीत. तुम्ही संधी देता, तुम्ही आमच्याकडून मोठे कामही करुन घेता, जेणेकरुन आमचे करिअर घडेल. पण याचा अर्थ असा नाही होत की आम्ही कुणाचे गुलाम आहोत.'