Russia-Ukraine War : रशिया यूक्रेन युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या युद्धात अजूनही रशियाला यश आलेलले नाही. युद्धात अनेक आधुनिक शस्त्रांचा वापर झाला. या युद्धामुळे युक्रेनमधील अनेक लोक ही बेघर झाली आहेत. लोकांना अन्नाची कमतरता भासू लागली असून अनेक ठिकाणी हिंसाचार उफळला आहे. असे असले तर युक्रेनियन लोकांच्या संघर्ष आजही सुरू आहे. पाहा फोटो
(1 / 14)
युक्रेनवरील रशियन आक्रमणाला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. कोविड महामारीनंतर रशिया-युक्रेनचे संकट दोन देशांपुरते मर्यादित नव्हते. या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसला. या युद्धामुळे जगावर अन्न आणि इंधन टंचाईची टांगती तलवार आहे. (AP)
(2 / 14)
राशीयाने हे युद्ध काही दिवसानंत थांबेल हा दवा केला होता. मात्र, वर्ष उलटले तर यूक्रेनच्या अनेक शहरांवर रशियन फौजांकडून आजही मोठ्या प्रमाणात हल्ले सुरू आहे. हे युद्ध आणखी किती लांबेल हे देखील सांगता येत नाही. (zelenskiy_official/instagram)
(3 / 14)
दोन दिवसांत व्लादिमीर पुतिन युक्रेनच्या दोन मोठ्या शहरांमध्ये, कीव आणि खार्किव येथे पोहोचले. यावेळी त्यांनी युद्धाचा आढावा घेतला. रशियाने दोन शहरांवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले करण्यास सुरुवात केली. रशियाने युक्रेनच्या ओडेसा बंदरावरही हल्ला केला. (zelenskiy_official/instagram)
(4 / 14)
युक्रेनवर रशियन आक्रमणाच्या एका वर्षापासून, युनेस्कोच्या म्हणण्यानुसार, नागरिकांच्या मृत्यूने २१ हजारचा आकडा पार केला आहे, ज्यामध्ये ८ हजार हून अधिक मृत आणि १२,२८७ लोक जखमी झाले आहेत.(zelenskiy_official/instagram)
(5 / 14)
युक्रेनमधील युद्धाचा फटका फक्त मानवांनाच नाही तर प्राण्यांनाही सहन करावा लागला. देशात अनेक सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला. युक्रेनच्या युद्धग्रस्त भागातून सुटका करण्याच्या प्रतीक्षेत अजूनही अनेक जखमी नागरिक आहेत.(@MariaSlavaUA/Twitter)
(6 / 14)
युद्धाच्या एक महिन्यानंतर मार्च २०२२ मध्ये, रशियाने खेरसन प्रदेशाचा ताबा घेतला आणि क्राइमिया आणि डोनेट्स आणि लुहान्स्कच्या डोनबास ओब्लास्ट्स दरम्यान जमीन पूल तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या महिन्यात सर्वाधिक नागरिक मारले गेले. प्रदेशावरील रशियन नियंत्रणामुळे युक्रेनियन लोकांचे देशाच्या इतर भागात मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले.(zelenskiy_official/instagram)
(7 / 14)
युक्रेनवर रशियाच्या आक्रमणामुळे सर्वात जास्त प्रभावित झालेल्यांपैकी लहान मुले होती. आक्रमणात अनेक मुले ही अनाथ झाली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाने आक्रमण केल्यापासून ५ हजाराहून अधिक मुलांना हद्दपार करण्यात आले आहे. (zelenskiy_official/instagram)
(8 / 14)
युक्रेनने बुचा येथे सर्वात वाईट युद्ध गुन्ह्यांपैकी एक पाहिला, जिथे रशियन सैन्याने नागरिक आणि युद्धकैद्यांची हत्या केली. युक्रेनियन शहराचा ताबा आणि लढा दरम्यान हे हत्याकांड करण्यात आले.(zelenskiy_official/instagram)
(9 / 14)
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये या हत्याकांडाचा व्हिडिओ समोर आला होता. नागरिकांच्या वक्तव्याचा हवाला देत मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियन सशस्त्र दलांनी शहरात ४०० हून अधिक नागरिकांना ठार मारले. (zelenskiy_official/instagram)
(10 / 14)
रशियन हल्ल्यामुळे युक्रेनमधील मारियुपोल शहर सर्वात जास्त प्रभावित झाले. १६ मार्च रोजी रशियाने केलेल्या एकाच हल्ल्यात ३०० हून अधिक लोक मारले गेले. शहरात मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी सामायिक कबर तयार करण्यात आल्या होत्या.(REUTERS)
(11 / 14)
पश्चिमेच्या पाठिंब्याशिवाय यूक्रेनला या युद्धात तग धरता आला नसता. यूएसए, यूके आणि इतर अनेक राष्ट्रे युक्रेनला मोठ्या प्रमाणात लष्करी संरक्षण उपकरणे पुरवत असल्याने यूक्रेनने रशियाला देखील चोख उत्तर दिले आहे. (AP)
(12 / 14)
युद्धमुळे यूक्रेनचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. याचा फटका हा रुग्णालयांना बसत आहे. (AP)
(13 / 14)
जेव्हा रशियाने युक्रेनियन पॉवर प्लांट्स आणि पॉवर ग्रिड्सवर हल्ला करायला सुरुवात केली तेव्हा रशियन आक्रमणाविरुद्धची लढाई आणखीनच बिकट झाली. मॉस्कोने त्यांच्या पॉवर ग्रीड सिस्टमवर केलेल्या हल्ल्यानंतर अनेक शहरे अंधारात होती.(AP)
(14 / 14)
विनाशाच्या एक वर्षानंतरही, युक्रेनचे सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी आणि रशियन आक्रमणापासून आपली जमीन वाचवण्यासाठी संघर्ष सुरूच आहे. आतापर्यंत, मॉस्कोने युद्ध संपवण्याचा कोणताही संकेत दिलेला नाही.(AP)