(2 / 5)रथ बनवण्याचे नियम : भगवान जगन्नाथाचा रथ बनवण्यासाठी तब्बल दोन महिने लागतात. यासाठी काही ठराविक कारागीर तिथे राहातात. त्यांना संपूर्ण दोन महिने काही नियमांचं पालन करावं लागतं. रथ तयार करण्यासाठी, पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लाकडाची निवड. रथासाठी खिळे किंवा खोदलेल्या लाकडाचा वापर केला जात नाही. रथाचे लाकूड सरळ आणि शुद्ध असावं लागतं.