आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. अशातच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील काही हॉरर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. हे कोणते चला पाहूया…
गुयांग : गुयांगची कथा इंडोनेशियन लोककथांवर आधारित आहे. गुयांग नावाचा एक पिशाच आहे ज्याचे अंड हरवले आहे. हा पिशाच नवजात अर्भक आणि गरोदर स्त्रियांचे रक्त पितो. अशा प्रकारे रक्ताचे सेवन केल्याने हा शैतान अमरत्व टिकवून ठेवतो.
मेगन : मुलांच्या सुरक्षेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक रोबोट तयार करण्यात येतो. पण या बाहुलीच्या प्रोग्रामिंगमध्ये गडबड असल्याचे पाहायला मिळते. पण गरजेपेक्षा जास्त सैरक्षण देण्याच्या नादात हा AI रोबोट विचित्र गोष्टी करु लागतो.
थँक्सगिव्हिंग: थँक्सगिव्हिंगच्या दिवशी एका व्यक्तीने आपल्या कुऱ्हाडीने लोकांची हत्या केल्याची ही भयानक कथा आहे. त्याने लोकांना का मारले असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
द कॉर्प्स वॉशर : या चित्रपटाची कथा बगदादमधील एका कुटुंबाची आहे जी मृतांना अंघोळ घालण्याचे काम करते. त्यांना या कामात अनेक समस्या येताना दिसतात.
त्रिनील : जेव्हा एक जोडपं हनिमूनवरून परततं, तेव्हा त्यांना जाणवतं, की एक भयानक सावली त्यांना सतावत आहे.