विवो टी३ लाईट 5G: या फोनचा ४ जीबी+१२८ जीबी व्हेरिएंट ऑफर्सनंतर ९ हजार ९९९ रुपयांच्या प्रभावी किमतीत सेलमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये ६.५६ इंचाचा एचडी डिस्प्ले, ५० मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा, ८ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा मिळत आहे. तसेच या फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
पोको सी७५ 5G: या फोनचा ४ जीबी+६४ जीबी व्हेरिएंट ऑफर्सनंतर ७ हजार ९९९ रुपयांच्या प्रभावी किमतीत सेलमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये ६.८८ इंचाचा एचडी डिस्प्ले, ५० मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये ५ हजार १६० मेगापिक्सलची बॅटरी मिळत आहे.
मोटो जी३५ 5G: सेलमध्ये फोनचा ४ जीबी+१२८ जीबी व्हेरिएंट ९ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या फोनमध्ये ६.७२ इंचाचा एचडी डिस्प्ले, ५० मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा, १६ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आणि ५००० एमएएचची बॅटरी मिळत आहे.
रेडमी १४ सी 5G: या फोनचा ४ जीबी+६४ जीबी व्हेरिएंट सेलमध्ये ९ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या फोनमध्ये ६.८८ इंचाचा एचडी डिस्प्ले, ५० मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा, ८ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आणि ५१६० एमएएच बॅटरी आहे.