ऑस्ट्रेलियाची खेळपट्टी आणि परिस्थिती भारतापेक्षा खूपच वेगळी आहे. यामुळेच भारतीय फलंदाजांना तिथे जाऊन धावा करणे कधीच सोपे नसते.
(1 / 7)
ऑस्ट्रेलियात धावा करणे भारतीय फलंदाजांसाठी कधीच सोपे नव्हते. तिथल्या खेळपट्टीवर भारतीय पीचेसपेक्षा जास्त वेग आणि उसळी आहे. त्यामुळेच फलंदाज अनेकदा अस्वस्थ होतात. पण अशा परिस्थितीतही अनेक भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियात जाऊन आपला झेंडा फडकवला आहे.
(2 / 7)
लहान वयातच काही भारतीय फलंदजांनी ऑस्ट्रेलियन भूमीवर जाऊन त्यांच्या गोलंदाजांची कसोटी घेतली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही भारतीय फलंदाजांनाबाबत सांगणार आहोत, ज्यांनी ऑस्ट्रेलियात जाऊन सर्वात कमी वयात कसोटी शतक झळकावले आहे.
(3 / 7)
सचिन तेंडुलकर- १८ वर्षे २५३ दिवस - ऑस्ट्रेलियात कसोटी शतक झळकावणारा सचिन तेंडुलकर हा सर्वात युवा भारतीय फलंदाज आहे. १९९२ मध्ये सचिन पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला गेला होता. सिडनी येथे झालेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात सचिनने २१३ चेंडूत १४८ धावा केल्या.
(4 / 7)
ऋषभ पंत- २१ वर्षे ९१ दिवस - ऋषभ पंतने २०१८-१९ मध्येही धमाका केला होता. सिडनीमध्ये झालेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात विकेटकीपर फलंदाज पंतने शतक झळकावले होते. वयाच्या २१ वर्षे ९१ दिवसात त्याने सिडनीत १५९ धावांची नाबाद खेळी खेळली.
(5 / 7)
दत्तू फडकर- २२ वर्षे ४२ दिवस- दत्तू फडकर हे ४० आणि ५० च्या दशकातील भारतातील आघाडीच्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक होते. त्यांनी कारकिर्दीतील केवळ तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियात शतक झळकावले. सिडनी आणि मेलबर्नमध्ये अर्धशतके झळकावल्यानंतर त्यांनी ॲडलेडमध्ये १२३ धावांची खेळी खेळलीहोती.
(6 / 7)
केएल राहुल- २२ वर्षे आणि २६५ दिवस- या यादीत केएल राहुलच्या नावाचाही समावेश आहे. राहुलने २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी पदार्पण केले होते. याच दौऱ्यातील सिडनीतील शेवटच्या सामन्यात राहुलने शतक झळकावले होते. त्यावेळी त्याचे वय २२ वर्षे २६५ दिवस होते.
(7 / 7)
यशस्वी जैस्वाल- २२ साल ३३० दिन- यशस्वी जैस्वाल ऑस्ट्रेलियात शतक झळकावणारा ५ वा सर्वात युवा भारतीय फलंदजा ठरला आहे. यशस्वीने पर्थच्या मैदानावर २०५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. पर्थ स्टेडियमवर यशस्वी शतक झळकावणारा तो भारताचा दुसरा फलंदाज आहे.