वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट म्हणजेच WWE चे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत. हा कुस्तीचा शो सर्वांनाच आवडतो. तसेच, या खेळात प्रचंड पैसा आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला WWE च्या ५ सर्वात श्रीमंत स्टार्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी प्रचंड नाव आणि पैसा कमावला आहे.
विन्स मॅकमोहन- WWE चा सर्वात श्रीमंत स्टार विन्स मॅकमोहन आहे. त्याची एकूण संपत्ती २६,००० कोटी रुपये आहे. तो WWE चा माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप लावण्यात आले होते.
ड्वेन जॉन्सन- यानंतर ड्वेन जॉन्सन अर्थात द रॉक याचा नंबर लागतो. द रॉक एक अमेरिकन अभिनेता आणि व्यावसायिक कुस्तीपटू आहे. तो एक बिझनेसमनही आहे. रॉकने 'फास्ट अँड फ्युरियस' सारख्या मोठ्या चित्रपटात काम केले आहे. द रॉक ८७०७ कोटी रुपयांचा मालक असल्याचे सांगितले जात आहे.
ट्रिपल एच- पॉल लेवेस्क याला ट्रिपल एच नावाने ओळखले जाते. त्याच्याकडेही भरपूर पैसा आहे. ट्रिपल एच २०९६ कोटी रुपयांचा मालक असल्याचे सांगितले जाते. तो सध्या WWE चा मुख्य कंटेट ऑफिसर आहे. २०२२ मध्ये त्याने कुस्तीतून निवृत्ती घेतली.
स्टेफनी मॅकमोहन- स्टेफनी मॅकमोहन हिच्याकडे WWE चे २.५ टक्के शेअर्स आहेत. ती २०९६ कोटींची मालकीण असल्याचे सांगितले जाते. स्टेफनी ट्रिपल एच याची पत्नी आहे.