अभिषेकच्या जागी यशस्वी जैस्वालचा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. मात्र शतक झळकावल्यानंतर पुढील सामन्यात बाहेर होणारा अभिषेक हा पहिलाच खेळाडू नाही. आपण अशा ५ खेळाडूंबद्दल जाणून आहोत, ज्यांना शतक झळकावल्यानंतरही प्लेईंग इलेव्हनमधून वगळण्यात आले.
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माने शतक झळकावले. त्याच्या ४७ चेंडूत १०० धावांच्या खेळीने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पण आता त्याला मालिकेतील तिसऱ्या सामन्यातून (१० जुलै) बाहेर बसावे लागू शकते.
केविन पीटरसन
इंग्लंडच्या केविन पीटरसनने २०१२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २१४ चेंडूत १४९ धावांची खेळी केली होती. या खेळीमुळे सामना अनिर्णित ठेवण्यात इंग्लंडला यश आले. तरीही पुढच्या सामन्यात केविन पीटरसन प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हता.
करुण नायर
करुण नायरने इंग्लंडविरुद्ध कसोटीत ३०३ धावांची खेळी केली होती. वीरेंद्र सेहवागनंतर त्रिशतक करणारा तो दुसरा फलंदाज ठरला. पण अजिंक्य रहाणेमुळे नायरला संधी मिळाली. रहाणेच्या पुनरागमनामुळे त्याला भारताच्या पुढील कसोटीतून वगळण्यात आले.
इशान किशन
इशान किशनने डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेश दौऱ्यावर वनडेमध्ये द्विशतक झळकावले होते. सलामीला फलंदाजी करताना इशानने २१० धावांची खेळी केली. यानंतर भारताने पुढील सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला. त्या वनडेमध्ये इशानच्या जागी शुभमन गिलचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता.
मनोज तिवारी
या यादीत मनोज तिवारीच्या नावाचाही समावेश आहे. २०११ मध्ये मनोज तिवारीने चेन्नईमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले होते. अवघड विकेटवरील या खेळीनंतरही त्याला संघातून वगळण्यात आले. पुढील १४ सामन्यांसाठी तिवारीचा भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता. निवृत्तीनंतर त्याने हा मुद्दाही उपस्थित केला होता.