मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  T20 World cup 2022: टीम इंडियाला या ५ खेळाडूंपासून सर्वात मोठा धोका, बनवावी लागेल विशेष रणनीती

T20 World cup 2022: टीम इंडियाला या ५ खेळाडूंपासून सर्वात मोठा धोका, बनवावी लागेल विशेष रणनीती

23 September 2022, 20:56 IST Rohit Bibhishan Jetnavare
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
23 September 2022, 20:56 IST

5 dangerous players for india in T20 World cup 2022:  भारत आणि पाकिस्तानसह जवळपास सर्वच देशांनी २०२२ च्या T20 विश्वचषकासाठी त्यांचे संघ जाहीर केले आहेत. वास्तविक, १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात T20 विश्वचषक सुरू होत आहे. यजमान ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला भारत-पाकिस्तान आणि इंग्लंड-दक्षिण आफ्रिका यांसारख्या संघांकडून कडवी टक्कर मिळणार आहे. याशिवाय रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठीही वर्ल्डकपमधला प्रवास सोपा असणार नाही. आज आपण अशा खेळाडूंबद्दल पाहणार आहोत जे T20 विश्वचषक २०२२ मध्ये भारतीय संघासाठी अडचणी निर्माण करू शकतात.

Shaheen Afridi- पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आशिया कप २०२२ मध्ये नव्हता परंतु २०२२ च्या T20 विश्वचषक स्पर्धेत तो पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. वास्तविक, भारतीय संघाला शाहीन आफ्रिदीपासून सावध राहावे लागेल. विशेषत: पॉवरप्लेमधील ओव्हर्समध्ये शाहीन त्याच्या स्विंग बॉलिंगमुळे खूप धोकादायक ठरू शकतो. T20 विश्वचषक २०२१ मध्ये शाहीनने भारताविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच षटकात रोहित शर्मा आणि केएल राहुलसारख्या फलंदाजांना बाद करून टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले होते. याशिवाय ऑस्ट्रेलियन पीचेस त्याच्यासाठी नंदनवन आहेत.

(1 / 6)

David Warner- डेव्हिड वॉर्नर २०२२ च्या टी-20 विश्वचषकात आपल्या फलंदाजीने एकहाती सामना फिरवू शकतो. डेव्हिड वॉर्नर आयपीएल व्यतिरिक्त जगभरातील अनेक लीगमध्ये खेळतो. हा फलंदाज त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नरला होमग्राऊंडवर खेळण्याचा फायदा मिळणार आहे. विशेषतः पॉवरप्ले ओव्हरमध्ये वेगाने धावा काढण्यासाठी डेव्हिड वॉर्नर प्रसिद्ध आहे.

(2 / 6)

Rashid Khan- राशिद खान हा या काळातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानला जातो. विशेषत: राशीदने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये खूप प्रभावित केले आहे. आयपीएलशिवाय राशिद खान जगभरातील अनेक लीगमध्ये खेळतो. अलीकडेच आशिया चषक २०२२ मध्ये या गोलंदाजाने आपले कौशल्य दाखवले आहे. २०२२ च्या टी-20 विश्वचषकादरम्यान भारतीय संघाला राशिद खानच्या फिरकीपासून सावध राहावे लागणार आहे.

(3 / 6)

Jos Buttler- जोस बटलर हा आयपीएल २०२२ मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. वास्तविक, जोस बटलरकडे वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त फिरकीपटूंविरुद्ध सहजतेने मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. पॉवरप्ले ओव्हरमध्ये इंग्लंड संघाला चांगला स्टार्ट देण्याची जबाबदारी जोस बटलरवर असेल. या स्पर्धेत भारतीय संघाला जोस बटलरपासूनही सावध राहावे लागणार आहे. इंग्लंडचा हा फलंदाज अवघ्या काही षटकांत सामन्याचे फासे उलटवू शकतो.

(4 / 6)

Liam Livingstone- लियाम लिव्हिंगस्टोनला सिक्स हिटिंग मशीन म्हणतात. वास्तविक, लियाम लिव्हिंगस्टोन सहजपणे मोठे फटके मारू शकतो. त्यामुळे त्याला सिक्स मारण्याचे मशीन म्हटले जाते. आयपीएल व्यतिरिक्त या फलंदाजाने इंग्लंडसाकडून खेळातानाही खूप प्रभावी कामगिरी केली आहे. लियाम लिव्हिंगस्टोन ज्याप्रकारे मोठे फटके सहज मारतो. त्यामुळे विरोधी संघांना सावधगिरी बाळगावी लागेल. याशिवाय लिव्हिंगस्टोनकडे ऑफ स्पिन आणि लेगस्पिन गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. अशाप्रकारे, फलंदाजीव्यतिरिक्त, हा खेळाडू गोलंदाजीनेही सामना फिरवू शकतो.

(5 / 6)

T20 World cup 2022

(6 / 6)

T20 World cup 2022(all photo- instagram)

इतर गॅलरीज