भारताने २००७ मध्ये तर पाकिस्तानने २००९ मध्ये टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. दोन्ही संघात अनेक चांगले खेळाडू आहेत. अशा स्थितीत या सामन्यात त्यांच्यात संघर्ष होणार आहे. आम्ही तुम्हाला अशाच ५ जोड्यांबाबत सांगणार आहोत, ज्यांच्यात जबरदस्त चुरस रंगू शकते.
कुलदीप यादव-फखर जमान- कुलदीप यादवला पहिल्या सामन्यात संधी मिळाली नाही पण या सामन्यात तो पुनरागमन करू शकतो. कुलदीपने पाकिस्तानविरुद्ध टी-20 खेळलेला नाही. पण एकदिवसीय सामन्यात त्याने फखर जमानला ३३ चेंडूत तीनदा बाद केले. फखरला रोखण्यासाठी भारतीय संघ या सामन्यात कुलदीप यादवला संधी देऊ शकतो.
रोहित शर्मा वि. मोहम्मद आमीर : रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मोहम्मद आमिरविरुद्ध ७ चेंडू खेळले आहेत. या रोहितने केवळ १ धाव केली असून तो दोनदा बाद झाला आहे. एकदिवसीय सामन्यात रोहितने आमिरविरुद्ध ४३ धावा केल्या आहेत पण त्यासाठी त्याने ७१ चेंडूंचा सामना केला आहे. सुरुवातीच्या षटकांमध्ये डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध रोहितला अडचणीचा सामना करावा लागतो. आयपीएल २०२४ मध्येही हे दिसून आले.
मोहम्मद रिझवान वि. अर्शदीप सिंग : पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करूनही मोहम्मद रिझवानने अर्शदीप सिंगविरुद्ध २३ चेंडूत केवळ २३ धावा केल्या. यात १३ डॉट बॉल आहेत. अर्शदीपने २०२२ च्या टी-20 विश्वचषक सामन्यात रिझवानला बाद केले होते. यावेळीही त्याला असेच काहीतरी करायला आवडेल.
जसप्री बुमराह- बाबर आझम : क्रिकेटमध्ये असे फार कमी फलंदाज आहेत, जे जसप्रीत बुमराहपासून वाचू शकले आहेत. यामध्ये बाबर आझमचेही नाव येऊ शकते. आतापर्यंत बुमराहने बाबरची विकेट घेतलेली नाही. बाबरने बुमराहविरुद्ध टी-20 मध्ये १० चेंडूत १३ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने ३९ चेंडूत २२ धावा केल्या आहेत.