आयपीएलच्या पहिल्या ५ हंगामात मुंबई इंडियन्सला एकदाही जेतेपद जिंकता आले नाही. त्यानंतर २०१३ मध्ये संघ पहिल्यांदा चॅम्पियन झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये चॅम्पियन बनले. मात्र, २०२१ ते २०२४ दरम्यान संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आले नाही.
दोनदा मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाला राहिला. आता मेगा ऑक्शनमध्ये मुंबईचा संघ आपल्या जुन्या खेळाडूंना विकत घेऊन पुन्हा पूर्वीसारखा तगडा संघ बनवण्याचा प्रयत्न करू शकतो. मुंबई इंडियन्स आपल्या जुन्या ५ खेळाडूंना पुन्हा खरेदी करू शकते.
राहुल चहर- युवा राहुल चहर हा मुंबई इंडियन्सचा प्रमुख फिरकी गोलंदाज होता. मुंबईसाठी त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला टीम इंडियातही संधी मिळाली. मुंबई सोडल्यानंतर त्याची कामगिरी सातत्याने घसरत आहे. राहुल स्वत: त्याच्या जुन्या फ्रँचायझीमध्ये परत येऊ इच्छितो.
क्विंटन डी कॉक - हा मुंबई इंडियन्सचा सलामीवीर होता, जो २०१९ आणि २०२० मध्ये रोहित शर्मासह चॅम्पियन बनला होता. दोन्ही हंगामात त्याच्या बॅटने ५०० हून अधिक धावा केल्या. मुंबई त्याला पुन्हा एकदा विकत घेऊन यष्टिरक्षकाची जबाबदारी देऊ इच्छित आहे.
जॉस बटलर - मुंबई इंडियन्सनेत जॉस बटलरला पहिल्यांदाच सलामीसाठी मैदानात उतरवले होते. तेव्हापासून इतिहास बदलला. राजस्थानने इंग्लिश कर्णधाराला सोडले आहे. अशा परिस्थितीत मुंबई त्याला विकत घेण्यासाठी जाऊ शकते.
कृणाल पांड्या- हार्दिकप्रमाणेच कृणाल पांड्या हादेखील मुंबई इंडियन्सचा शोध आहे. २०१६ ते २०२१ या हंगामात तो फ्रँचायझीचा भाग होता आणि तीन वेळा चॅम्पियन बनण्यात त्याने भूमिका बजावली. क्रुणाल लखनौ सुपर जायंट्समध्ये तीन हंगामात होता पण यावेळी त्याला सोडण्यात आले.