मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Ranji Trophy : अफगाणिस्तान मालिका संपताच संजू-रिंकू, दुबे रणजी ट्रॉफीत, पण इशान किशन कुठे आहे?

Ranji Trophy : अफगाणिस्तान मालिका संपताच संजू-रिंकू, दुबे रणजी ट्रॉफीत, पण इशान किशन कुठे आहे?

Jan 19, 2024 08:59 PM IST Rohit Bibhishan Jetnavare
  • twitter
  • twitter

  • Sanju Samson Rinku Singh in Ranji Trophy 2024 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटचा सामना १७ जानेवारी रोजी मध्यरात्री संपला. यानंतर टीम इंडियाचे काही खेळाडू लगेच १९ जानेवारी रोजी सकाळी आपापल्या रणजी संघात समाविष्ट झाले. पण इशान किशनचा अद्याप पत्ता नाही.

इशान किशनला टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने रणजी क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे. पण तो रणजी खेळताना दिसला नाही. दरम्यान, आपण येथे टीम इंडियाच्या अशा ५ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. जे अफगाणिस्तान मालिका संपल्यानंतर अवघ्या काही तासांनंतर त्यांच्या रणजी संघात सामील झाले.
twitterfacebookfacebook
share

(1 / 6)

इशान किशनला टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने रणजी क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे. पण तो रणजी खेळताना दिसला नाही. दरम्यान, आपण येथे टीम इंडियाच्या अशा ५ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. जे अफगाणिस्तान मालिका संपल्यानंतर अवघ्या काही तासांनंतर त्यांच्या रणजी संघात सामील झाले.

संजू सॅमसन- विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनही रणजी ट्रॉफी खेळत आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या टी-20 मध्ये त्याला संधी मिळाली. सामन्यात गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्येदेखील त्याला एकही धाव करता आली नाही. आता संजू मुंबई विरुद्ध केरळकडून रणजीमध्ये खेळत आहे.
twitterfacebookfacebook
share

(2 / 6)

संजू सॅमसन- विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनही रणजी ट्रॉफी खेळत आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या टी-20 मध्ये त्याला संधी मिळाली. सामन्यात गोल्डन डकवर बाद झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्येदेखील त्याला एकही धाव करता आली नाही. आता संजू मुंबई विरुद्ध केरळकडून रणजीमध्ये खेळत आहे.(PTI)

रिंकू सिंग- रिंकू सिंगने बेंगळुरूमध्ये भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सामना संपल्यानंतर तो मेरठला पोहोचला. तिकडे रिंकू उत्तर प्रदेशकडून रणजी ट्रॉफीमध्ये बिहारविरुद्ध सामना खेळत आहे. 
twitterfacebookfacebook
share

(3 / 6)

रिंकू सिंग- रिंकू सिंगने बेंगळुरूमध्ये भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सामना संपल्यानंतर तो मेरठला पोहोचला. तिकडे रिंकू उत्तर प्रदेशकडून रणजी ट्रॉफीमध्ये बिहारविरुद्ध सामना खेळत आहे. (AFP)

तिलक वर्मा-  तिलक वर्माला अफगाणिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळण्याची संधी  मिळाली. मात्र विराट कोहली परतल्यानंतर तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडला. दोन सामने बेंचवर बसल्यानंतर तिलकहैदराबादकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहेत.
twitterfacebookfacebook
share

(4 / 6)

तिलक वर्मा-  तिलक वर्माला अफगाणिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळण्याची संधी  मिळाली. मात्र विराट कोहली परतल्यानंतर तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडला. दोन सामने बेंचवर बसल्यानंतर तिलकहैदराबादकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहेत.(PTI)

जितेश शर्मा- अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. तिसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. आता तो विदर्भासाठी सौराष्ट्रकडून रणजी खेळत आहे.
twitterfacebookfacebook
share

(5 / 6)

जितेश शर्मा- अफगाणिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. तिसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. आता तो विदर्भासाठी सौराष्ट्रकडून रणजी खेळत आहे.

शिवम दुबे-  शिवम दुबेने अफगाणिस्तान मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांत त्याने नाबाद अर्धशतके झळकावली. त्याला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कारही मिळाला. बेंगळुरूमध्ये सामना खेळल्यानंतर त्याने थेट तिरुअनंतपुरम गाठले. तिकडे तो मुंबईकडून केरळविरुद्ध सामना खेळत आहे.
twitterfacebookfacebook
share

(6 / 6)

शिवम दुबे-  शिवम दुबेने अफगाणिस्तान मालिकेत अप्रतिम कामगिरी केली. मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांत त्याने नाबाद अर्धशतके झळकावली. त्याला प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कारही मिळाला. बेंगळुरूमध्ये सामना खेळल्यानंतर त्याने थेट तिरुअनंतपुरम गाठले. तिकडे तो मुंबईकडून केरळविरुद्ध सामना खेळत आहे.(PTI)

WhatsApp channel

इतर गॅलरीज