देशासाठी पदार्पण करणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. यासोबतच पदार्पणाच्या सामन्यात प्रत्येक खेळाडूवर खूप दडपण असते. मग गोलंदाज असो की फलंदाज. गोलंदाजीत अनेकवेळा अनुभवी फलंदाज गोलंदाजासमोर येतात, तेव्हा गोलंदाजी करणे खूप अवघड होते, विशेषत: टी-20 क्रिकेटमध्ये. पण यानंतरही पदार्पण करणारे अनेक खेळाडू अप्रतिम कामगिरी करतात.

अजित आगरकर- भारतासाठी पदार्पणाच्या ची-20 सामन्यात मेडन ओव्हर टाकणारा अजित आगरकर हा पहिला गोलंदाज होता. १९९८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या आगरकरने २००६ मध्ये पहिला टी-20 खेळला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा सामना भारताचाही पहिला टी-२० सामना होता. यात त्याने पहिले ओव्हर मेडन टाकल होते.
खलील अहमद- डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदने २०१८ मध्ये भारतासाठी टी-20 पदार्पण केले. त्याने पहिला सामना कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. त्या सामन्यात खलीलने ४ षटके टाकली आणि १६ धावांत एक बळी घेतला. यातील पहिली ओव्हर मेडन होती.
नवदीप सैनी- झंझावाती वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनेही पदार्पणाच्या टी-२० सामन्यात मेडन ओव्हर टाकली आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले. अमेरिकेत खेळल्या गेलेल्या सामन्यात सैनीने २० वे षटक टाकले आणि एकही धाव दिली नाही. त्या सामन्यात त्याने १७ धावांत ३ बळी घेतले होते.
अर्शदीप सिंग- डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने भारताकडून २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला T20 सामना खेळला. त्या सामन्यात त्याने पहिलेच षटकात मेडन टाकले. विशेष म्हणजे जेसन रॉयविरुद्ध त्याने हे षटक टाकले होते. त्या सामन्यात अर्शदीपने १८ धावांत २ बळी घेतले होते.