IPL 2025 Auction : नावं मोठी, पण बोली लागणार का? आयपीएल लिलावात अनसोल्ड राहू शकतात हे दिग्गज खेळाडू
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2025 Auction : नावं मोठी, पण बोली लागणार का? आयपीएल लिलावात अनसोल्ड राहू शकतात हे दिग्गज खेळाडू

IPL 2025 Auction : नावं मोठी, पण बोली लागणार का? आयपीएल लिलावात अनसोल्ड राहू शकतात हे दिग्गज खेळाडू

IPL 2025 Auction : नावं मोठी, पण बोली लागणार का? आयपीएल लिलावात अनसोल्ड राहू शकतात हे दिग्गज खेळाडू

Nov 20, 2024 06:34 PM IST
  • twitter
  • twitter
  • IPL 2025 Auction : आयपीएल २०२५ साठीच्या मेगा लिलावात काही मोठी नावे दिसणार आहेत, ज्यांची कामगिरी मागील हंगामात ढासळली आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या बोली लावल्या जाणार नाहीत, किंवा यातील काही खेळाडू अनसोल्डदेखील राहू शकतात.
IPL २०२५ साठी खेळाडूंचा मेगा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे, ज्यासाठी भारत आणि परदेशातील ५७४ खेळाडू निवडले गेले आहेत. जोस बटलर, केएल राहुल, ऋषभ पंत, ग्लेन मॅक्सवेल आणि श्रेयस अय्यर यांसारखे प्रसिद्ध खेळाडूही आयपीएल लिलावात उतरणार आहेत.
twitterfacebook
share
(1 / 7)

एकीकडे पंत आणि बटलरसारखे काही निवडक खेळाडू लिलावात सर्वाधिक किमतीला विकले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण यामध्ये असेही काही खेळाडू आहेत, ज्यांचे नाव क्रिकेट विश्वात खूप मोठे आहे पण कदाचित त्यांना लिलावात जास्त पैसे मिळणार नाहीत?
twitterfacebook
share
(2 / 7)

इशांत शर्मा - इशांत शर्माने मेगा लिलावासाठी त्याची मूळ किंमत ७५ लाख रुपये ठेवली आहे. इशांत २०१९ पासून दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता, पण यावेळी त्याला सोडण्यात आले आहे. गेल्या दोन मोसमात त्याने फारशी चांगली कामगिरी केलेली नाही आणि मोसमातील सर्व सामने खेळण्याची संधीही त्याला मिळाली नाही. यावेळी त्याच्यावरची बोली कोटींमध्ये जाण्याची शक्यता फारच कमी आहे.
twitterfacebook
share
(3 / 7)

अजिंक्य रहाणे - अजिंक्य रहाणे कसोटी क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. २०२३ मध्ये, तो चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाला, जिथे त्याने १७२.४९ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली, परंतु २०२४ मध्ये त्याने निराशा केली. गेल्या मोसमात खेळण्यासाठी त्याला ५० लाख रुपये मिळाले, पण फ्रँचायझी हे देखील लक्षात ठेवेल की त्याचा आयपीएलमधील एकूण स्ट्राइक रेट १२४ पेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत त्याच्यावर खूप कमी बोली लावल्या जाऊ शकतात.
twitterfacebook
share
(4 / 7)

विजय शंकर - विजय शंकर गेल्या तीन सीझनपासून गुजरात टायटन्सकडून खेळत आहे. २०२४ मध्ये, त्याने ७ सामन्यांमध्ये केवळ ८३ धावा केल्या आणि गोलंदाजीमध्ये योगदान देऊ शकला नाही. त्याची प्रथम श्रेणी कारकिर्दीची आकडेवारी चांगली आहे, त्यामुळे तो  कसोटी फॉरमॅटमध्ये चांगला खेळाडू मानला जातो. 
twitterfacebook
share
(5 / 7)

केन विल्यमसन - अजिंक्य रहाणेप्रमाणे केन विल्यमसन यालाही मोठी रक्कम मिळणार नाही. विल्यमसन गेल्या मोसमात गुजरात टायटन्सचा भाग होता आणि त्याला हंगाम खेळण्यासाठी २ कोटी रुपये मिळाले होते. विल्यमसनने २०२४ मध्ये ६ सामन्यात केवळ १११ धावा केल्या होत्या. हा खराब फॉर्म आणि चांगल्या स्ट्राईक रेटचा अभाव हे देखील विल्यमसनवर कमी बोली लावण्याचे कारण ठरू शकते.
twitterfacebook
share
(6 / 7)

पियुष चावला - गेल्या २ आयपीएल सीझनमध्ये पियुष चावलाने मुंबई इंडियन्ससाठी २७ मॅचमध्ये ३५ विकेट घेतल्या आहेत. गेल्या मोसमात खेळण्यासाठी एमआयने त्याला ५० लाख रुपये दिले होते. मात्र नव्या आणि युवा गोलंदाजांच्या या युगात पियुषचे नाव कुठेतरी हरवले आहे.  जरी त्याने आयपीएल करिअरमध्ये १९२ बळी घेतले असले तरी, मेगा लिलावात पियुषला मोठी रक्कम मिळणार नाही. तसेच, तो अनसोल्ड राहण्याचाही धोका आहे.
twitterfacebook
share
(7 / 7)

इतर गॅलरीज