पोको एक्स ७ प्रो 5G: या फोनमध्ये ६.७३ इंचाचा फ्लॅट डिस्प्ले मिळतो. पोको एक्स ७ प्रोच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत २४ हजार ९९९ रुपये इतकी आहे. फोनवर १००० रुपयांची बँक सूट देखील आहे. मीडियाटेक डायमेन्सिटी ८४०० अल्ट्रा प्रोसेसरसह येतो. हे LPDDR5X मेमरी आणि UFS ४.० स्टोरेजसह येते. हा फोन सॉलिड इलेक्ट्रोलाइट तंत्रज्ञानाचा वापर करून ६५५०mAh सिलिकॉन-कार्बन बॅटरीने सुसज्ज आहे, जे ९० वॅट हायपरचार्जला सपोर्ट करते, ज्यामुळे हा फोन ४७ मिनिटांत पूर्ण चार्ज होते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
पोको एक्स ७ प्रो 5G: या फोनमध्ये ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा मिळतो. तर, अल्ट्रा-वाइड कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये २० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे. हा फोन 4K रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.
वनप्लस नॉर्ड सीई ३: वनप्लस नॉर्ड सीई ३ मध्ये ६.७-इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन २४१२ x १०८० पिक्सेल आहे आणि त्याचा रिफ्रेश रेट १२०Hz पर्यंत आहे. २५ हजारांपेक्षा कमी किंमतीतील फोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी चांगला पर्याय आहे.
(OnePlus)वनल्पस नॉर्ड सीई ४: वनल्पस नॉर्ड सीई ४ मध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज ३.१ स्टोरेज मिळते. फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.
नथिंग फोन २ए प्लस: नथिंग फोन २ए प्लसमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे. यात माली-जी६१० एमसी४ जीपीयूसह ऑक्टा-कोर ४ एनएम मीडियाटेक डायमेन्सिटी ७३५० प्रो ५जी प्रोसेसर आहे. नथिंग फोन (२ए) प्लस अमेझॉनवरून २३,७८६ रुपयांना खरेदी करता येईल. कंपनी नवीन फोनसाठी ३ वर्षांचे अँड्रॉइड अपडेट्स आणि ४ वर्षांचे सुरक्षा पॅच देण्याचे आश्वासन देते. यात १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज असू शकते.