भारतीय संघ २०२४ च्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर, दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाईल, ज्याला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी म्हणूनही ओळखले जाते.
(1 / 6)
या मालिकेतील पहिला कसोटी सामना २२ नोव्हेंबरला पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. या मोठ्या मालिकेपूर्वी आम्ही तुम्हाला त्या ५ फलंदाजांबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.
(2 / 6)
सचिन तेंडुलकर- बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम क्रिकेटचा देव म्हणून प्रसिद्ध असलेला भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. मास्टर ब्लास्टरने या मालिकेत १९९६ ते २०१३ पर्यंत एकूण ३४ सामने खेळले. या काळात त्याने ६५ डावात ३२६२ धावा केल्या. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सचिनने ९ शतके आणि १६ अर्धशतके झळकावली आहेत.
(3 / 6)
रिकी पॉंटिंग- या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज आणि कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावाचाही समावेश आहे. पाँटिंगने १९९६ ते २०१२ या कालावधीत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये २९ सामने खेळले. या काळात पाँटिंगने ५१ डावात २५५५ धावा केल्या. पाँटिंगच्या नावावर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ८ शतके आणि १२ अर्धशतके आहेत.
(4 / 6)
व्हीव्हीएस लक्ष्मण- भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने १९९८ ते २०१२ या कालावधीत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये २९ सामने खेळले. या काळात त्याने ५४ डावात २४३४ धावा केल्या. लक्ष्मणने या मालिकेत ६ शतके आणि १२ अर्धशतके झळकावली.
(5 / 6)
राहुल द्रविड - १९९६ ते २०१२ पर्यंत भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ३२ सामने खेळले. या कालावधीत द्रविडने खेळलेल्या ६० डावांमध्ये २१४३ धावा केल्या आहेत. या मालिकेत त्याच्या बॅटने २ शतके आणि १३ अर्धशतके झळकावली आहेत.
(6 / 6)
मायकेल क्लार्क- २००४ ते २०१४ पर्यंत ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज आणि कर्णधार मायकेल क्लार्कने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये एकूण २२ सामने खेळले आहेत. या काळात त्याने खेळलेल्या ४० डावांमध्ये २०४९ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ७ शतके आणि ६ अर्धशतके आहेत.