होन्डाने आपली लोकप्रिय मोटारसायकल २०२५ होन्डा एसपी १६० भारतात लॉन्च केली आहे. सिंगल डिस्क व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत अनुक्रमे १ लाख २१ हजार ९५१ रुपये आणि ड्युअल डिस्क व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १ लाख २७ हजार ९५६ रुपये आहे.
२०२५ मॉडेलमध्ये मोटरसायकलचे फ्रंट डिझाइन पूर्वीपेक्षा अधिक शार्प आणि आकर्षक करण्यात आले आहे. नवीन हेडलॅम्पमुळे बाइकला अधिक स्टायलिश लूक मिळतो. मात्र, उर्वरित बॉडीवर्कमध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही. ही मोटारसायकल आता चार कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे, यात रेडियंट रेड मेटॅलिक, पर्ल इग्नेस ब्लॅक, पर्ल डीप ग्राउंड ग्रे आणि अॅथलेटिक ब्लू मेटॅलिक या रंगांच्या पर्यायांचा समावेश आहे.
होन्डाने एसपी १६० मध्ये ग्राहकांना ४.२ इंचाची टीएफटी स्क्रीन मिळेल, जी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि होन्डा रोडसिंक अॅप कनेक्टिव्हिटीसह येईल. यात तुम्हाला टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, कॉल आणि एसएमएस अलर्ट आणि म्युझिक प्लेबॅक सारखे फीचर्स देण्यात येणार आहेत. याशिवाय यात यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे, जेणेकरून लांबच्या प्रवासात फोन चार्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.