(2 / 6)अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' सध्या बॉक्स ऑफिसवर आपल्या दमदार कामगिरीमुळे चर्चेत आहे. मात्र, या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी एक दुःखद घटना घडली. हैदराबादमध्ये 'पुष्पा २'च्या प्रीमियर दरम्यान चेंगराचेंगरी झाली. यावेळी एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.