Snow hit Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी आणि पावसामुळे १६८ रस्ते बंद; पाहा फोटो
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Snow hit Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी आणि पावसामुळे १६८ रस्ते बंद; पाहा फोटो

Snow hit Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी आणि पावसामुळे १६८ रस्ते बंद; पाहा फोटो

Snow hit Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी आणि पावसामुळे १६८ रस्ते बंद; पाहा फोटो

Published Mar 31, 2024 07:26 AM IST
  • twitter
  • twitter
  • Snow hit Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी आणि पाऊस सुरू आहे. राज्य आपत्कालीन यंत्रेनेनुसार या हिमवृष्टीमुळे येथील १६८ रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. दरम्यान, येथील निसर्ग फुलला असून हिमवृष्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक या ठिकाणी भेटी देत आहेत.
हिमाचल प्रदेश येथील उंचावरील आणि  आदिवासी बहुल भागात पुन्हा मोठ्या प्रमाणात  बर्फवृष्टी झाली, तर सखल आणि मध्यम टेकड्यांवर शनिवारी अधूनमधून गारपीट आणि पाऊस झाला. हवामान विभागाने  हिमाचल प्रदेशात ४ एप्रिलपर्यंत हिमवृष्टी आणि पावसाची शक्यता वर्तवली आहे.  
twitterfacebook
share
(1 / 8)

(PTI)
राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी रात्री राज्यातील तीन राष्ट्रीय महामार्गांसह एकूण १६८ रस्ते  वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. 
twitterfacebook
share
(2 / 8)

(ANI)
राजधानी शिमला आणि इतर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गारपिटीमुळे सोलनमध्ये ये-जा करणे कठीण झाले होते. 
twitterfacebook
share
(3 / 8)

प्रचंड बर्फवृष्टीमुळे मनालीजवळील रोहतांग येथील अटल बोगद्यावर वाहतूक ठप्प झाली. गेल्या २४ तासांत कल्पा आणि कुकुमसेरी येथे ५ सेंटीमीटर, त्यानंतर केलाँगमध्ये ३ सेंटीमीटर बर्फवृष्टी झाली.
twitterfacebook
share
(4 / 8)

स्थानिक हवामान खात्याने शनिवारी राज्यातील १२ पैकी सात जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, गारपीट, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रतितास) सह वादळी वादळाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. 
twitterfacebook
share
(5 / 8)

दरम्यान, हिमाचल प्रदेश वाहतूक, पर्यटक आणि रेल्वे पोलिसांनी शनिवारी लाहौल आणि स्पिती जिल्ह्यांसाठी वाहतूक कशी राहील याची माहिती जारी केली. 
twitterfacebook
share
(6 / 8)

हिमाचल प्रदेशात आजूबाजूच्या भागात प्रचंड बर्फवृष्टी होत आहे, आणि  सोलांग नाल्यापर्यंतचा रस्ता कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीसाठी योग्य नाही,"अशी माहिती हिमाचल प्रदेश पोलिसांनी सोशल मिडियावर पोस्ट केली आहे.  
twitterfacebook
share
(7 / 8)

हिमाचल प्रदेशच्या उंच भागात शनिवारी सकाळी नवीन हिमवृष्टी झाल्यानंतरचे दृश्य. 
twitterfacebook
share
(8 / 8)

हिमाचल प्रदेशच्या उंच भागात शनिवारी सकाळी नवीन हिमवृष्टी झाल्यानंतरचे दृश्य. 

(ANI )
इतर गॅलरीज