युरोपमध्ये अनेक देशात पुरामुळे हाहाकार; रस्ते, रेल्वेमार्ग वाहून गेले… २० जणांचा मृत्यू
मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  युरोपमध्ये अनेक देशात पुरामुळे हाहाकार; रस्ते, रेल्वेमार्ग वाहून गेले… २० जणांचा मृत्यू

युरोपमध्ये अनेक देशात पुरामुळे हाहाकार; रस्ते, रेल्वेमार्ग वाहून गेले… २० जणांचा मृत्यू

युरोपमध्ये अनेक देशात पुरामुळे हाहाकार; रस्ते, रेल्वेमार्ग वाहून गेले… २० जणांचा मृत्यू

Updated Sep 17, 2024 08:20 PM IST
  • twitter
  • twitter
  • पूर्व आणि मध्य युरोपातील देशांमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. रस्ते, रेल्वेमार्ग खचले असून पावसामुळे आत्तापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.
पोलंडमध्ये अनेक नागरी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्यानंतर असे दृष्य होते. अनेक ठिकाणी पूरग्रस्त मदतीची वाट पाहताना दिसत आहेत. पूरग्रस्तांना खाद्यपदार्थ, वीज, कपड्यांची गरज असल्याचे दिसून येत आहे.
twitterfacebook
share
(1 / 6)

(REUTERS)
युरोपमध्ये पुरामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले असून रेल्वेमार्ग पाण्याखाली गेले आहेत. परिणामी अनेक शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. सर्वाधिक नुकसान झेक प्रजासत्ताक आणि पोलंड या देशांमध्ये झाले आहे.
twitterfacebook
share
(2 / 6)

(AFP)
युरोपमधील झेक प्रजासत्ताक देशातील ओस्त्रावा शहराचे हे दृष्य. मुसळधार पावसामुळे शहराजवळून वाहणाऱ्या दोन नद्यांचं पाणी या शहरात घुसल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली. शहरात अनेक रासायनीक कारखाने सुद्धा जलमय झाले आहे. मदत व बचावकार्य पथकाने बोटीद्वारे शहरातील हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. 
twitterfacebook
share
(3 / 6)

युरोपातील पोलंड, ऑस्ट्रिया, हंगेरी, रोमानिया, स्लोव्हेकिया या देशांमध्येही पावसामुळे हाहाकार माजला असून आत्तापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. युरोपमध्ये ‘बोरिस’ नावाच्या वादळामुळे मुसळधार पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. अनेक शहरांमध्ये नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
twitterfacebook
share
(4 / 6)

पोलंडमध्ये न्यासा शहरात असलेल्या सरोवराच्या पाण्याची पातळी वाढल्याने फुटण्याची भीती निर्माण झाल्याने हेलिकॉप्टरद्वारे अशा वाळूच्या गोण्या आणून लावण्यात आल्या. वादळामुळे अनेक शहरांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. युरोपमध्ये गेल्या दोन दशकांत एवढा जास्त पाऊस झालेला नसल्याचे जाणकार सांगतात. काही शहरांमध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी चिखल साचलेला दिसत आहे. 
twitterfacebook
share
(5 / 6)

युरोपमध्ये आलेल्या वादळी पावसाचे पाणी असे घरांमध्ये शिरले आहे. त्यामुळे अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ते, घरं खचू नये म्हणून वाळूच्या गोण्या घरासमोर ठेवण्यात येत आहे. पूरग्रस्त वस्त्यांमधून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. 
twitterfacebook
share
(6 / 6)

इतर गॅलरीज