टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील साखळी सामने संपले आहेत.आता सुपर-८ फेरीत ८ संघ आमनेसामने येणार आहेत.
सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत यजमान देशांसह १२ संघ २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत.
भारत आणि श्रीलंका २०२६ मध्ये विश्वचषकाच्या दहाव्या आवृत्तीचे यजमानपद भूषवणार आहेत. पात्रतेपूर्वी यजमान देशांना प्राधान्य दिले जाईल.
सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात सुपर-८ मध्ये प्रवेश केलेले आठ संघही पुढील विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. भारत त्यापैकीच एक आहे. लीगमधून बाहेर पडलेले तीन संघ रँकिंगच्या माध्यमातून पात्र ठरले आहेत.
अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, अमेरिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि भारत सुपर-8 साठी पात्र ठरले आहेत. हे संघ विश्वचषकासाठीही पात्र ठरले आहेत.
आयसीसी टी-२० क्रमवारीनुसार न्यूझीलंड, पाकिस्तान आणि आयर्लंड हे संघ आगामी विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत. हे तिन्ही संघ सध्या सुरू असलेल्या स्पर्धेत लीगमधून बाहेर आहेत.