आज २२ जानेवारीला होणार्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी अयोध्येत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महंत नृत्य गोपाल दास यांनी गुजरातमधून आणलेली १०८ फूट लांबीची अगरबत्ती प्रज्वलित केली.
(PTI)महंत नृत्य गोपाल दास यांनी "जय श्री राम" असा जयघोष करत मोठ्या जनसमुदायामध्ये गुजरातमधील वडोदरा येथून आणलेली अगरबत्ती पेटवली.
(PTI)३,६१० किलो वजनाची आणि सुमारे साडेतीन फूट रुंदीची अगरबत्ती गुजरातच्या वडोदरा येथून अयोध्या येथे आणण्यात आली.
(PTI)गाईचे शेण, तूप, सार, फुलांचे अर्क आणि औषधी वनस्पती वापरून ही अगरबत्ती तयार करण्यात आली आहे. ही अगरबत्ती एकदा प्रज्वलित झाल्यानंतर, सुमारे दीड महिना पेटती राहणार आहे.
(PTI)अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक सोहळा आज २२ जानेवारी रोजी होणार आहे. या साठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
(PTI)