इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या रवींद्र जडेजाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत असा विक्रम आजवर कोणालाही करता आलेला नाही. फलंदाजी आणि गोलंदाजीबरोबरच जाडेजा हा दमदार क्षेत्ररक्षकही आहे.
(PTI)रवींद्र जाडेजा आयपीएलमध्ये १००० धावा, १०० विकेट्स आणि १०० झेल घेणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
(CSK-X)जडेजाने सोमवारी (९ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ३ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच श्रेयस अय्यरचा झेल घेतला. यासह त्याने आयपीएलमध्ये १०० झेल पूर्ण केले.
(AFP)जडेजाने आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा चेन्नई सुपर किंग्जकडून सामनावीर होण्याच्या महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याने पंधराव्यांदा सीएसकेसाठी सामनावीर पुरस्कार जिंकला. जडेजाने आपल्या आयपीएल कारकिर्दीत खेळलेल्या २३१ सामन्यात २ हजार ७७६ धावा, १५६ विकेट्स आणि १०० झेल घेतले आहेत.
(IPL-X)