Worst IPOs in 2024 : सरतं वर्ष शेअर बाजारासाठी आयपीओ वर्ष ठरलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र, सगळ्याच आयपीओंनी गुंतवणूकदारांना फायदा दिला असं नाही. काही आयपीओंनी मोठा झटका दिला. २०२४ मध्ये सर्वात फ्लॉप ठरलेले १० आयपीओ कोणते पाहूया
(1 / 10)
२०२४ हे वर्ष IPO मार्केटसाठी खूप खास होतं. या वर्षात अनेक कंपन्यांचे IPO गुंतवणुकीसाठी खुले झाले. काही आयपीओंनी लिस्टिंगच्या दिवशी गुंतवणूकदारांना दणदणीत परतावा दिला तर काहींची कामगिरी अतिशय खराब होती. त्यामुळं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचं नुकसान झालं. जाणून घेऊना गुंतवणूकदारांना धक्का देणाऱ्या अशा १० IPO बद्दल…
(2 / 10)
आर के स्वामी लिमिटेडचा आयपीओ १२ मार्च २०२४ रोजी BSE आणि NSE वर सूचीबद्ध झाला होता. RK स्वामी IPO चा दरपट्टा २७० ते २८८ रुपये प्रति शेअर होता. मात्र, कंपनीचे शेअर्स १४ टक्क्यांनी घसरून २५० रुपयांवर सूचीबद्ध झाले.
(3 / 10)
गोपाळ स्नॅक्स कंपनीचा शेअर १४ मार्च रोजी BSE आणि NSE वर लिस्ट झाला होता. या शेअरची आयपीओ किंमत ४०१ रुपये होती. प्रत्यक्षात हा शेअर १२.४७ टक्क्यांनी घसरून ३५१ रुपयांवर सूचीबद्ध झाला.
(4 / 10)
कॅपिटल स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ बीएसई आणि एनएसईवर १४ फेब्रुवारीला लिस्ट झाला होता. या शेअरची आयपीओ किंमत ४६८ रुपये होती. प्रत्यक्षात कंपनीचे शेअर्स ८ टक्क्यांपेक्षा जास्त घसरून ४३०.२५ रुपयांवर सूचीबद्ध झाले.
(5 / 10)
कॅरारो इंडियाचा आयपीओ ३० डिसेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट झाला. या शेअरची आयपीओ प्राइस ७०४ रुपये होती. हा शेअर बीएसई आणि एनएसईवर ७ टक्क्यांपेक्षा जास्त तोट्यासह ६५१ रुपयांवर सूचीबद्ध झाला.
(6 / 10)
jg chemicals ipo : जेजी केमिकल्सचा आयपीओ १३ मार्च रोजी BSE आणि NSE वर सूचीबद्ध झाला होता. आयपीओमध्ये या शेअरची किंमत २२१ रुपये होती. प्रत्यक्षात कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांपेक्षा जास्त घसरून २०९ रुपयांवर सूचीबद्ध झाले.
(7 / 10)
जना स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ १४ फेब्रुवारी रोजी लिस्ट झाला होता. आयपीओ किंमत ४१४ रुपये होती. प्रत्यक्षात हा शेअर BSE आणि NSE ३९६ रुपयांवर लिस्ट झाला.
(8 / 10)
ईपॅक ड्युरेबल्सचा आयपीओ ३० जानेवारी रोजी BSE आणि NSE वर सूचीबद्ध झाला होता. या शेअरची आयपीओ किंमत २३० रुपये होती. प्रत्यक्षात कंपनीचा शेअर २२१ रुपयांवर सूचीबद्ध झाला.(PTI)
(9 / 10)
गोदावरी बायोरिफायनरीजचा आयपीओ बीएसई आणि एनएसईवर ३० ऑक्टोबर रोजी सूचीबद्ध झाला होता. आयपीओमध्ये शेअरची किंमत ३५२ रुपये होती. प्रत्यक्षात हा शेअर ३०८ रुपयांवर सूचीबद्ध झाला.
(10 / 10)
एसएमई सोलर होल्डिंगचा आयपीओ १३ नोव्हेंबर २०२४ रोजी BSE आणि NSE वर सूचीबद्ध झाला होता. त्याची आयपीओ किंमत २८९ रुपये होती. प्रत्यक्षात हा शेअर २५१ रुपयांवर सूचीबद्ध झाला होता.
(11 / 10)
Afcons Infrastructure IPO : अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा आयपीओ ४ नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. आयपीओची किंमत ४६३ रुपये होती. प्रत्यक्षात हा शेअर अवघ्या ४२६ रुपयांवर सूचीबद्ध