राजकारणाबद्दल बोलणे सगळ्यांनाच आवडते. असेही अनेक जण आहेत, त्यांना समजो किंवा न समजो, पण ते राजकारणात पूर्ण रस दाखवतात. तुम्हालाही अशीच आवड असेल तर, आम्ही तुमच्यासाठी राजकारणावर आधारित अशाच काही वेब सीरिज घेऊन आलो आहोत, ज्या तुम्ही एकदा अवश्य पाहायला हव्यात.
बॉबी देओल स्टारर 'आश्रम'चे तीनही सीझन खूप पसंत केले गेले आहेत. यामध्ये तुम्हाला एका बाबावर लोकांची असलेली अंधश्रद्धा तर दिसेलच, पण अतिशय घाणेरडे राजकारणही दिसेल. तुम्ही ही सीरिज एमएक्स प्लेयरवर पाहू शकता.
'सिटी ऑफ ड्रीम्स'चे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यात प्रिया बापट, अतुल कुलकर्णी आणि एजाज खान मुख्य भूमिकेत दिसले आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही सीरिज तुम्ही पाहू शकता.
राजकारणाची आवड असेल, तर तुम्ही 'द ब्रोकन न्यूज' एकदा जरूर बघाच. श्रिया पिळगावकर आणि जयदीप अहलावत यांच्या यातील कामाचे खूप कौतुक झाले आहे. यामध्ये सोनाली बेंद्रे महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे. ही सीरिज तुम्हाला ‘झी ५’वर पाहायला मिळेल.
हुमा कुरेशी स्टारर 'महाराणी' या वेब सीरिजचे तीन सीझन पूर्ण झाले आहेत. यामध्ये तुम्हाला राजकारणातील बरेच काही पाहायला मिळेल. तुम्ही ही सीरिज सोनी लिव्हवर पाहू शकता.
'मिर्झापूर'चे तीन सीझन आतापर्यंत रिलीज झाले आहेत. ही सीरिज लोकांना खूप आवडली आहे. त्यात राजकारणाचा प्रत्येक पैलू दाखवण्यात आला आहे. यामध्ये पंकज त्रिपाठी, अली फजल आणि दिव्येंदू शर्मा यांनी आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे. तुम्ही ही सीरिज प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर तुम्ही जयदीप अहलावत आणि अभिषेक बॅनर्जी स्टारर वेब सीरिज 'पाताल लोक' पाहू शकता.