पुढील बातमी

#लॉकडाऊन

देशात कोरोना विषाणूचे संक्रमण वाढू लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी, २४ मार्चला रात्री देशाला उद्देशून केलेल्या भाषणात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. बुधवार, २५ मार्चपासून हा लॉकडाऊन अंमलात आला. या २१ दिवसांच्या काळात कोणालाही आपल्या घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक सेवा यांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. या काळात देशातील दळणवळणाची सर्व साधने बंद राहणार आहेत. 

बातम्या