पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वय वर्षे 70, पण पहिल्यांदाच भाजपची उमेदवारी आणि मतदानाची संधी!!

डॉ. मृणाल कांती देबनाथ

लोकसभेची निवडणूक काहीजणांसाठी खूप महत्त्वाची असते. पहिल्यांदा मतदान करणारे तरुण मतदार, पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार, राजकारणात नव्याने येऊ पाहणारे नेते आणि कार्यकर्ते यांचा यामध्ये समावेश होतो. पण पश्चिम बंगालमधील बारासात लोकसभा मतदारसंघातील भाजपचे 70 वर्षांचे उमेदवार डॉ. मृणाल कांती देबनाथ यांच्यासाठी ही निवडणूक जरा जास्तच महत्त्वाची ठरणार आहे. कारण या निवडणुकीत पहिल्यांदाच ते उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्याचबरोबर ते या मतदारसंघात मतदानाचा अधिकारही पहिल्यांदाच बजावणार आहेत. 

भारतीय जनता पक्षाने त्यांना या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस विरोधात मतदानासाठी उतरविल्यानंतर त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल नवी माहिती पुढे आली. डॉ. मृणाल देबनाथ यांनी 1974 नंतर मोठा काळ अमेरिका, युरोप आणि कॅरेबिया द्विप समुहांमध्ये वास्तव्य केले. त्यामुळे त्यांनी या काळात मतदान केलेच नाही. त्यापूर्वीची आठवण सांगताना डॉ. मृणाल देबनाथ म्हणतात, 18 वर्षे पूर्ण झाल्यावर ते जेव्हा पहिल्यांदा मतदान करण्यासाठी वडिलांसोबत मतदान केंद्राकडे निघाले होते, त्यावेळी त्यांचे मतदान झाले आहे, असे सांगत स्थानिक गुंडांनी त्यांना मतदान केंद्राबाहेरूनच हाकलून दिले होते. त्यामुळे तेव्हा मतदान करण्याची त्यांची संधी हुकली होती. त्यानंतर परदेशी असल्यामुळे त्यांनी मतदानच केले नाही. परदेशातून परत आल्यानंतरही पश्चिम बंगालमधील मतदान प्रक्रिया आणि तेथील गुंडांचा वावर बघून त्यांनी मतदानच केले नव्हते. दरम्यान, डॉ. मृणाल देबनाथ यांच्या मताशी विरोधक सहमत नाहीत. ते खोटे बोलत असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

डॉ. मृणाल देबनाथ यांचा जन्म बांगलादेशमधील खुलना जिल्ह्यात झाला. 1964 मध्ये ते कुटुंबियांसमवेत उत्तर 24 परगणामध्ये स्थायिक झाले. त्यानंतर एमबीबीएसची पदवी घेतल्यावर ते उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:loksabha election 2019 story of 70 year old contestent from west bengal who will vote for first time dr debnath