पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ख्राईस्टचर्चमधील आरोपीवर ५० लोकांची हत्या केल्याचा खटला

ख्राईस्टचर्च हल्ल्यानंतर घटनास्थळी सुरू झालेले मदतकार्य

न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्चमध्ये दोन मशिदींवर हल्ला करून अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या आरोपीवर ५० निष्पाप लोकांचा बळी घेतल्याचा खटला चालविण्यात येणार आहे. याच आठवड्यात आरोपी ब्रँटन टॅरेंट याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यापूर्वी त्याच्यावर एक हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. पण आता ५० लोकांचा जीव घेतल्याचा आरोप टॅरेंटवर ठेवण्यात येईल. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्यावतीने न्यूझीलंड पोलिस ही कारवाई करणार आहेत. 

ख्राईस्टचर्चमधील हल्ल्यानंतर देशातील मुस्लिम बांधवांबद्दल सदभावना दाखविण्यासाठी तेथील महिला पोलिसांनी प्रतिकात्मक बुरखाही घातला होता. आता या घटनेतील आरोपीविरोधात ख्राईस्टचर्चमधील उच्च न्यायालयात खटला चालविण्यात येणार आहे. ज्यामध्ये त्याच्यावर ५० लोकांची हत्या केल्याचा आणि ३९ लोकांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप ठेवण्यात येईल. टॅरेंट याच्यावर इतरही आरोप ठेवण्यावर सध्या न्यूझीलंड पोलिस विचार करीत आहे. पण त्याबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. योग्यवेळी ही कलमे दाखल केली जातील, असे पोलिसांनी सांगितले. १६ मार्चला पहिल्यांदा टॅरेंटला पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते.

मूळ ऑस्ट्रेलियाचा नागरिक असलेल्या ब्रँटन टॅरेंटने १५ मार्च रोजी ख्राईस्टचर्चमधील अल नूर मशीद आणि शहराच्या बाहेरच्या भागात असलेल्या लिनवूड मशिदीवर गोळीबार केला होता. ज्यामध्ये ५० लोकांचा मृत्यू झाला होता.