पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्मृती इराणी पदवीधर नाहीतच!

स्मृती इराणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सुरुवातीला मनुष्यबळ विकास विभागाची जबाबदारी देण्यात आल्यावर स्मृती इराणी यांच्यावर जोरदार टीका झाली होती. स्वतः पदवीधऱ नसलेल्या व्यक्तीवर एवढ्या मोठ्या विभागाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे मोदींवरही टीका झाली. पण त्यावेळी स्मृती इराणी नक्की पदवीधर आहेत की नाही, याबद्दल अधिकृत खुलासा झाला नव्हता. अखेर उमेदवारी अर्जाच्या माध्यमातून स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती पुढे आली आहे. स्मृती इराणी या पदवीधर नाहीत. दिल्ली विद्यापीठातून आपण पदवी शिक्षण पूर्ण केले नसल्याचे त्यांनी स्वतःच उमेदवारी अर्जात लिहिले आहे.

स्मृती इराणी यंदाही अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यांनी १९९१ साली आपण दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालो तर १९९३ साली बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे म्हटले आहे. वाणिज्य शाखेचा पदवी अभ्यासक्रम आपण पूर्ण केलेला नसल्याचे त्यांनी लिहिले आहे. दिल्ली विद्यापीठातून या अभ्यासक्रमासाठी त्यांनी प्रवेश घेतला होता. 

२०१४ मध्ये स्मृती इराणी यांनी अमेठीमधूनच राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी उमेदवारी अर्जावर पदवीधर असे लिहिले होते. १९९४ मध्ये आपण पदवीधर झाल्याचे त्यांनी म्हटले होते. याच मुद्द्यावरून पुढे वाद झाला होता. आज अखेर त्या वादावर पडदा पडला. 

स्मृती इराणी यांच्याकडे एकूण ४.७१ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे. यामध्ये १.७५ कोटी रुपयांची जंगम तर २.९६ कोटी रुपयांची स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.