पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

झाकीर नाईकच्या भाषणांमुळे प्रभावित होऊन १२७ तरूण आयसिसच्या संपर्कात

झाकीर नाईक

आयसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या १२७ तरुणांकडून मिळालेली माहिती धक्कादायक स्वरुपाची आहे. वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या भाषणांमुळे प्रभावित होऊन आपण आयसिसच्या संपर्कात आल्याचे या तरुणांनी म्हटले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) संचालक वाय सी मोदी यांनी दहशतवादविरोधी पथकांच्या एका परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली.

नियंत्रण रेषेवरील सैन्यदलांच्या संख्येत लष्कराकडून मोठी वाढ

या परिषदेमध्ये देशातील महत्त्वाच्या सुरक्षा यंत्रणा, पोलिस यंत्रणांचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित आहेत. त्यांच्याशी संवाद साधताना मोदी यांनी देशापुढील दहशतवादाच्या आव्हानांचा आढावा घेतला. बांगलादेशस्थित दहशतवादी संघटना जमात उल मुजाहिदीनने आपले पाय महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकमध्ये पसरल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची निवड निश्चित