पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिथावणीखोर वक्तव्य; झाकीर नाईकला मलेशियात भाषण करण्यास बंदी

झाकीर नाईक

चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकला मलेशियात सार्वजनिक ठिकाणी भाषण करण्यास बंदी घातली आहे. मलेशियाचे पंतप्रधान मोहम्मद महाथिर यांनी यापूर्वी झाकीर नाईकला भारतात प्रत्यार्पण करण्यास नकार दिला होता. आता हाच झाकीर नाईक मलेशियासाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या काही वर्षांपासून नाईक हा मलेशियात राहत आहे. भारत सरकारने झाकीरच्या प्रत्यार्पणाची मागणी केला आहे. 

राष्ट्रीय सुरक्षा ध्यानात घेऊन असा निर्णय घेतल्याचे मलेशिया पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. रॉयल मलेशिया पोलिसांचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी दतुक अस्मावती अहमद यांनी सरकारचा आदेश मिळालेल्या वृत्तास दुजोरा दिला आहे. 

मोदींशी बोलल्यानंतर ट्रम्प म्हणाले, काश्मीरमध्ये स्थिती कठीण, पण चर्चा चांगली झाली

बर्नामा वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, झाकीर नाईकला पोलिस मुख्यालयात बुकीत अमानमध्ये जबाब नोंदवण्यासाठी दुसऱ्यांदा बोलावले गेले होते. झाकीरचा शांतता भंग केल्याप्रकरणी दंड संहिता कलम ५०४ अंतर्गत जबाब नोंदवण्यात आला आहे. 

नाईकने यापूर्वी १६ ऑगस्टला आपला जबाब नोंदवला होता. त्याने ३ ऑगस्ट रोजी कोटा बारु येथे मलेशियामध्ये राहत असलेल्या हिंदू आणि चिनी नागरिकांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर तेथील मंत्र्यांच्या कॅबिनेट बैठकीत नाईकला पुन्हा भारतात पाठवण्याची मागणी केली होती.