पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मूसानंतर दहशतवादी संघटना सांभाळणाऱ्या हमीद लल्हारीचा खात्मा

हामिद लल्हारी

जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या कारवाईमध्ये लष्कराला मोठे यश मिळाले आहे. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा परिसरातील राजपुरा गावात झालेल्या चकमकीत अंसार गजावत उल हिंद या दहशतवादी संघटनेचा कमांडर हामीद लल्हारी याला ठार करण्यात जवानांना यश आले आहे. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यांची ओळख पटली असून त्यामध्ये हामीद लल्हारीचा समावेश आहे.

भारताने पाकिस्तानला दिलेल्या प्रत्युत्तरात १८ दहशतवादी ठार

जम्मू- काश्मीर पोलिसांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, ज्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले त्यांची नाव नवीद ताक, हमीद लोन उर्फ हामिद लल्हारी आणि जुनैद भट्ट अशी आहेत. हामीद लल्हारीला मूसाच्या मृत्यूनंतर कमांडर बनवण्यात आले आहे. 

कोल्हापूरात सापडले ६९ गावठी बॉम्ब; दोघांना अटक

अल कायदाचा कमांडर झाकीर मुसा याला यावर्षी मे महिन्यात जवानांनी ठार मारले होते. दक्षिण काश्मीरमधील त्राल येथे झालेल्या चकमकीत मुसाला ठार करण्यात जवानांना यश आले होते. मुसाला पुलवामातील त्याच भागामध्ये ठार करण्यात आले. ज्याठिकाणी २०१६ मध्ये जवानांनी हिजबुल या दहशतवादी संघटनेचा कमांडर बुरहान वाणीला ठार केले होते. 

विधानसभा निवडणूक : मतमोजणीबद्दलची सर्व माहिती एका क्लीकवर