पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माझं सोशल मीडिया अकाउंट हॅक झालेलं नाही : झायरा

झायरा वासीम

बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीमने सोशल मीडियावरून बॉलिवूडला अलविदा करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर तिचे अकाउंट हॅक झाल्याची चर्चा रंगली होती. याशिवाय तिने हा निर्णय कोणाच्यातरी दबात घेतल्याचा सूरही उमटल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता झायराने ट्विटच्या माध्यमातून अकाउंट स्वत: वापरत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. माझे सोशल मीडिया अकाउंट मी स्वत: वापरत असून अकाउंट हॅक  झालेलं नाही, अशी माहिती तिने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. 

'दंगल गर्ल' झायरा वसीमची 'या' कारणामुळे अभिनयातून 'एक्झिट'

झायराचे मॅनेजर तुहीन मिश्रा यांनी देखील एएनआयला याबाबत स्पष्टिकरण दिले आहे. झायराचे अकाउंट हॅक झाल्याच्या वृत्ताला नकार देत ते म्हणाले की, झायराने स्वत: तिच्या अकाउंटवरुन बॉलीवूडमध्ये काम करणार नसल्याबाबतती पोस्ट शेअर केली होती. याविषयी आणखी काही बोलायचे नाही, असेही ते म्हणाले.  

 रवीना टंडननं झायरा वसीमला सुनावले खडे बोल

झायराने रविवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये आल्यापासून अल्लाह आणि माझ्यात अंतर निर्माण झाले आहे, असा उल्लेख करत तिने अभिनयातून एक्झिट करत असल्याचा निर्णय घेतल्याची पोस्ट शेअर केली होती. यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अभिनेत्री रविना टंडनसह अनेकांनी झायराला सुनावले. दरम्यान तिचे अकाउंट हॅक झाल्याची चर्चाही रंगली होती. पण झायरानं ही पोस्ट खुद्द केली होती, हे तिने स्वत: स्पष्ट केले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Zaira Wasim tweetsthis to clarify that none of my social media accounts were or are hacked and are being handled by me personally