पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वायएसआर काँग्रेसच्या खासदाराने घेतला शहीद पोलिसाच्या बुटाचा मुका

खासदार गोरंटला माधव (HT Photo)

वायएसआर काँग्रेसचे खासदार गोरंटला माधव यांनी तेलुगू देशम पक्षाचे (टी़डीपी) नेते जे सी दिवाकर रेड्डी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत शहीद पोलिसाच्या बुटाचा मुका घेतला आणि ते साफही केले. 

CAA: यूपीमध्ये आंदोलन चिघळले, गोळीबारात ५ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यातील हिंदूपूर लोकसभा मतदारसंघाचे माधव हे प्रतिनिधित्व करतात. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी परवानगी दिल्यास टीडीपी नेत्याला धडा शिकवण्यासाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा पोलिस दलात सहभागी होऊ अशी घोषणा त्यांनी केली.

CAA: आंदोलकांना शांतता राखण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

टीडीपी पुन्हा सत्ता आल्यास पोलिसवाल्यांना आपले बूट चाटावे लागतील, असे टीडीपीचे नेते रेड्डी यांनी बुधवारी अनंतपूर येथील पक्षाच्या बैठकीत म्हटले होते. अनंतपूर जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांच्या संघाने त्यांना विनाशर्त माफी मागण्यास सांगितले होते. त्यांनी माफी नाही मागितली तर त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला जाईल, असा इशाराही दिला होता. 

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी पोलिस निरीक्षक राहिलेले खासदार माधव यांनी रेड्डी यांच्या वक्तव्याचा निषेध केला. रेड्डी यांचे वक्तव्य हे पोलिस दलाचे अपमान करणारे आहे. पोलिस कायदा सुव्यवस्था आणि देशाची अंखडतेचे रक्षण करतात. 

बिहारमध्ये एनआरसी लागू करणार नाहीः नितीश कुमार

माधव यांनी हिंदुस्थानशी बोलताना म्हटले की, मी दिवाकर रेड्डी यांचा विरोध करण्यासाठी अनंतपूर जिल्ह्यातील शहीद झालेल्या एका पोलिसाचे बूट मी साफ केले आणि त्याचे चुंबनही घेतले. पोलिसांनी लोकांचा जीव वाचवण्यासाठी आणि देशाचे रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान केले आहे, असेही ते म्हणाले.