पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIRAL : १५ महिन्यांनंतर सापडला पाण्यात पडलेला आयफोन आणि...

१५ महिन्यांनंतर सापडला आयफोन

एका युट्यूबरला जवळपास १५ महिन्यानंतर पाण्यात हरवलेला आयफोन सापडला. आश्चर्य म्हणजे १५ महिन्यांनंतरही हा आयफोन चांगल्या स्थितीत होता आणि सुरू होता. ‘nuggetnoggin’ युट्यूब चॅनेलवर याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पावसाळा संपला, राज्यात सरासरीपेक्षा जास्त तर पुण्यात रेकॉर्डब्रेक पाऊस

मायकल बेनेट या युट्युबरला दक्षिण कॅरोलिनामधील एका नदीत हा आयफोन सापडला. मायकलचा स्वत: युट्यूब चॅनेल आहे ज्याचे ७.४ लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत.  मायकल त्याला प्रवासात सापडलेल्या वस्तूंचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. 
मायकल आणि त्याचे मित्र नदीत पोहत असताना त्यांना तळाशी फोन सापडला. हा फोन वॉटरप्रुफ केसमध्ये होता. त्यामुळे पाण्याच्या तळाशी असूनही तो सुरक्षित होता. मायकलनं हा फोन आपल्यासोबत आणला. त्यानं आयफोन चार्ज करून पाहिला. आश्चर्य म्हणजे तो सुरू झाला आणि चांगल्या स्थितीत होता. 

मंदिराच्या खोदकामावेळी सापडले कोट्यवधीचे सुवर्णालंकार

हा  फोन इरिका बेनेट या महिलेचा होता, मायकलनं तो तिला परत केला. या फोनमध्ये माझ्या वडिलांनी मला पाठवलेला मेसेज होते. ते मी जपून ठेवले. आता माझे  वडील हयात नाही, हा फोन हरवला तेव्हा त्यांचे अमुल्य मेसेजेस मी गमावले याचं दु:ख  मला सतत बोचत होतं. मात्र हा फोन सापडल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झालाय असं इरिका म्हणाली.