पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नोटाबंदीविरोधात दिल्लीत आंदोलन; काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

काँग्रेसचे आंदोलन

नोटाबंदीला शुक्रवारी तीन वर्ष पूर्ण झाले. नोटाबंदीच्या विरोधात दिल्लीमध्ये काँग्रेसने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालया बाहेर आंदोलन केले. आंदोलनकर्त्या काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  आंदोलनामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्यासंख्येने सहभागी झाले आहेत. आंदोलन व्यापक होत चालल्यामुळे पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. मोदी सरकारच्या धोरणाविरोधात काँग्रेसने हे  आंदोलन केले आहे.  

उद्धव ठाकरेंचा निर्णय आमच्यासाठी अंतिमः एकनाथ शिंदे

८ नोव्हेंबर २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्याची घोषणा केली होती. मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वस्तरावरुन जोरदार विरोध करण्यात आला होता. नोटीबंदीच्या निर्णयाविरोधात जनता रस्त्यावर देखील उतरली होती. नोटाबंदीच्या काळात बँक आणि एटीएमबाहेर मोठ्या रांगा लागल्या होत्या. नोटाबंदीनंतर सरकारने ५०, १००, २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नविन नोटा चलनात आणल्या होत्या.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार; उद्धव ठाकरे ठाम

दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी शुक्रवारी केंद्र सरकारवर निशाणा साधत नोटाबंदी 'आपत्ती' असल्याचे म्हटले होते. नोटाबंदीने देशाच्या अर्थव्यवस्थेला उध्वस्त करुन टाकले आहे. याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यांनी नोटाबंदीला ३ वर्ष पूर्ण झाल्यासंदर्भात एक ट्विट केले. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. 

काँग्रेस शिवसेनेचा पाठिंबा घेईल का, शरद पवारांचा सवाल