पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रशांत किशोर यांच्याविरोधात कल्पना चोरल्याचा आरोप, फसवणुकीचा गुन्हा दाखल

प्रशांत किशोर

प्रसिद्ध निवडणूक प्रचार रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याविरोधात बिहारमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारमधील मोतीहारी येथील रहिवासी शाश्वत गौतम यांची कल्पना चोरल्याचा आरोप प्रशांत किशोर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लाईव्ह हिंदुस्तानने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

कोरोना : जपानच्या जहाजात अडकलेले ११९ भारतीय २० दिवसांनी मायदेशी परतले

'बात बिहार की' ही नवी प्रचार मोहिम प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी सुरू केली. ही कल्पना आपली असल्याचे शाश्वत गौतम यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. आपला एक माजी सहकारी ओसामा याने ही कल्पना प्रशांत किशोर यांना सुचविली आणि ती त्यांनी जशीच्या तशी वापरली, असे शाश्वत गौतम यांचे म्हणणे आहे. शाश्वत गौतम यांनी ओसामा यांच्याविरोधातही तक्रार दाखल केली आहे.

वायुसेनेच्या विमानातून चीनमधल्या ७६ भारतीयांना आणले माघारी

शाश्वत गौतम हे आधी काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. तर ओसामा यांनी पाटणा विद्यापीठामध्ये विद्यार्थी निवडणूक लढविली होती. शाश्वत गौतम यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, बिहार की बात या नावाने आपण जानेवारीमध्येच एक डोमेन नेम आरक्षित करून ठेवले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये प्रशांत किशोर यांनी फेब्रुवारीमध्ये या नावाने नवी वेबसाईट सुरू केली. शाश्वत गौतम यांनी आपल्या दाव्यासाठी पोलिसांना काही पुरावेही दिले आहेत. या नंतर पोलिसांनी प्रशांत किशोर यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासघात) नुसार गुन्हे दाखल केले. पोलिस अधिक तपास करीत आहेत.