पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीतील हवा प्रदूषणावरून सुप्रीम कोर्टाने राज्यकर्तांना फटकारले आणि...

दिल्लीतील हवा प्रदूषण

दिल्ली आणि उत्तर भारतातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी राज्यकर्ते आणि प्रशासन गंभीर पावले उचलत नसल्याबद्दल बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर या प्रकरणी जे जे नियम तोडत आहेत, त्यांना न्यायालय माफ करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

आता प्रियांका चतुर्वेदींकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा

राज्यकर्त्यांना गंभीर शब्दांत खडे बोल सुनावताना न्यायालयाने म्हटले आहे की, तुम्ही नुसते हस्तीदंती मनोऱ्यात बसला आहात. लोक मरायला लागली आहेत पण तुम्हाला त्यांचे काहीही पडलेले नाही.

पश्चिमी उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये पराली अर्थात धसकटं जाळली जात असल्याचा विषय न्यायालयाने गांभीर्याने घेतला आहे. धसकटं जाळण्यावर सरकार रोख का लावू शकत नाही. हा विषय व्यापक पद्धतीने हाताळला पाहिजे. केवळ धसकटं जाळणे रोखूनही प्रदूषण कमी होणार नाही, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. न्या. अरूण मिश्रा आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी झाली.

अनावश्यक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये अ‍ॅड व्हायचे नाही? मग हे करा....

न्यायालयाने दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांनाही सुनावणीसाठी बोलावून घेतले होते. शेतकऱ्यांकडील सर्व धसकटं थेट सरकारने विकत घेण्याची योजना तयार करा. त्याचबरोबर जर धसकटं जाळली गेली तर त्यासाठी संपूर्ण प्रशासनाला दोषी धरा, अशीही सूचना न्यायालयाने सर्व मुख्य सचिवांना केली.