पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

होय तुम्ही दहशतवादी, जावडेकरांचा CM केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप

प्रकाश जावडेकर

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केजरीवाल दहशतवादी आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते दहशतवादी असल्याचे अनेक पुरावे आहेत, असे जावडेकर यांनी म्हटले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप नेत्यांकडून राज्याचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर शाब्दिक फटकारे मारण्यात येत आहेत.  

... म्हणून काँग्रेस नेता शत्रुघ्न सिन्हांनी केला PM मोदींना सलाम

 प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन अरविंद केजरीवाल यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. केजरीवाल भोळ्या चेहऱ्याने 'मी दहशतवादी आहे का?', असे विचारत आहेत. याचे उत्तर होय आहे. जावडेकरांनी हा गंभीर आरोप करताना केजरीवाल यांच्या एका वक्तव्याचा दाखला देखील दिला.  मी अराजकवादी आहे, असे जाहीर वक्तव्य खुद्द केजरीवाल यांनी केल्याचे सांगत अराजकवादी आणि दहशतवादी यात फारसा फरक नसतो, असे जावडेकर यांनी म्हटले आहे.  

'आप' कल्याणकारी योजनेतील अडथळा, PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा

जावडेकरांच्या विधानावर आम आदमी पक्षाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून या वक्तव्याबद्दल जावडेकरांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारी पक्षाकडून सुरु असल्याचे समजते. जावडेकर यांच्यापूर्वी भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनीही अरविंद केजरीवाल यांची तुलना दहशतवाद्यांशी केली होती. त्यांनी जाहीर सभेत केजरीवालांसारखे दहशतवादी देशात लपल्याचे म्हटले होते. याला केजरीवालांनी संयमीरित्या उत्तर दिले होते. मी मुलाप्रमाणे वाटत असेन तर झाडू या चिन्हाला मत द्या आणि दहशतवादी वाटत असेन तर कमळाचे बटन दाबा, असे केजरीवालांनी म्हटले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: you are a terrorist there is plenty of proof for it Union Minister Prakash Javadekar On Arvind Kejriwal