पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'विकास कामाचा निधी देशविरोधी घोषणाबाजी करण्याऱ्यांसाठी वापरला जातो'

योगी आदित्यनाथ

काश्मीरमधील दहशतवाद्यांचे समर्थन करणारी मंडळीच शाहिन बाग येथे आंदोलन करत आहेत, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या  प्रचारसभेत ते बोलत होते.  या प्रचारसभेत त्यांनी काँग्रेस आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. दिल्लीच्या विकासासाठी मंजूर होणारा निधी हा भारताविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांसाठी वापरला जातो, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.  

अर्थसंकल्पात महाराष्ट्रासह मुंबईवरही अन्याय: उद्धव ठाकरे

काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याचा दाखला देताना योगी आदित्यनाथ म्हणाले की,  काँग्रेस आणि केजरीवाल दगडफेक करणाऱ्यांचे समर्थन करत होते. आम्ही या दगडफेक करणाऱ्यांना यमसदनी पाठवायला सुरुवात केली आहे. आम्ही अशा लोकांना बिर्याणी नाही तर गोळी घालतो. योगी आदित्यनाथ यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करणाऱ्यांवरही निशाणा साधला. जे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'एक भारत, श्रेष्ठ भारत’ या धोरणेला विरोध करतात तेच आंदोलन करत आहेत. काँग्रेस अयोध्येतील राम मंदिराला विरोध करत होते. इंग्रज आणि मुघल देखील अशाच प्रकारे विरोध करायचे. मात्र, मोदी सरकार आल्यानंतर देशातील वातावरण बदलत आहे. राम मंदिर बांधलं जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

राहुल गांधींच्या त्या प्रश्नावर PM मोदींनी असा दिला रिप्लाय

दिल्लीत विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून प्रचारसभा घेतल्या जात आहेत. प्रचारसभांमध्ये नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दिल्लीत सर्वाधिक जागांवर सत्ता यावी, यासाठी भाजपकडून प्रचंड प्रयत्न सुरु आहेत. केजरीवाल सरकारला शह देऊन भाजप दिल्लीचा गड राखणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.