पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'सरदार पटेलांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे सार्थक झाले'

योगी अदित्यनाथ

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा दहशतवादाला समूळ नष्ट करण्यावर जालीम उपाय आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी म्हटले आहे. गुरुवारी त्यांनी एका कार्यक्रमात जम्मू काश्मीरमधील ऐतिहासिक निर्णयावर भाष्य केले. 

चिदंबरम यांच्या आत्मसमर्पण अर्जावरील निकाल कोर्टाने ठेवला

यावेळी योगी अदित्यनाथ म्हणाले की, कलम ३७० रद्द करुन सरकारने फक्त डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न साकार केलेले नाही. तर या निर्णयामुळे सरदार पटेल, डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या विचार सार्थक करणारा आहे. १९५३ मध्ये डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी यांनी 'एक विधान, एक निशान आणि एक प्रधान' असा संकल्प केला होता. ७० वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. मुखर्जी यांचे स्वप्न साकार केले, असे ते म्हणाले.

कुलभूषण जाधव प्रकरणात भारत पुन्हा 'आयसीजे'कडे दाद मागणार    

भाजपने तत्वांशी आणि सिद्धांताशी  कधीही तडजोड केलेली नाही. मूल्ये, आदर्श आणि संकल्पाच्या जोरावरच पक्षाने १६ राज्यासह केंद्रात लोकप्रिय सरकार स्थापन केले, असेही योगी अदित्यनाथ यांनी सांगितले.