पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी योगासनाला मीडिया इव्हेंट बनवत आहेत, दिग्विजय सिंह यांचा टोला

दिग्विजय सिंह

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संपूर्ण जगभरात आज (शुक्रवार) योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रांची येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मात्र यावरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी एकापाठोपाठ एक ट्विट केले. मोदीजी योगासनाचा तुम्ही प्रचार करत आहात, त्यासाठी तुमचे अभिनंदन. परंतु, योग ध्यान, प्राणायमचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक व्यक्तीने कोणते आसन करावे हे त्याच शरिराच्या ठेवणीवर तो अवलंबून असते. ज्याप्रकारे तुम्ही याचा मीडिया इव्हेंट बनवत आहात, तो प्रकार अनुचित आहे. प्रत्येक व्यक्तीने त्याच्या शरिराप्रमाणे एखाद्या चांगल्या वैद्याच्या मार्गदर्शनाखाली योग्य आसन केले पाहिजे. अन्यथा एखाद्या आसनामुळे तुमचे नुकसानही होऊ शकते. योगासनाला आयुर्वेद चिकित्सेबरोबर जोडणे योग्य ठरेल, असेही ते म्हणाले. 

यावरच न थांबता म्हणाले की, अडवाणीजी म्हणाले होते की तुम्ही चांगले इव्हेंट मॅनेजर आहात. याला जोडून मी म्हणतो की, तुम्ही चांगल्या इव्हेंट मॅनेजरबरोबरच एक चांगले मीडिया मॅनेजरही आहात. तुमच्या यशाचे हेच रहस्य आहे. बरोबर ना ? मी मागील ४० वर्षांपासून योग ध्यान आणि प्राणायाम करत आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी यापेक्षा चांगली कोणतीच पद्धत नाही.