पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

येस बँकेचे व्यवहार सायंकाळी ६ वाजेपासून पूर्ववत

येस बँक

बुडीत कर्ज आणि व्यवहारातील अनियमिततेमुळे येस बँकेवर घालतेले निर्बंध आजपासून मागे घेण्यात येत आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेने ५ मार्च रोजी येस बँकेवर आर्थिक निर्बंध लादले होते. मात्र आता येस बँकेच्या पुनर्बांधणीचा आराखडा सादर झाल्यानंतर बँकेचे व्यवहार सायंकाळी ६ वाजेपासून पूर्ववत होतील. यामुळे आता खातेधारकांना खात्यातून ५० हजारांहून अधिक रक्कम काढता येणार आहे. 

कोरोनाविरोधात लढण्यासाठी 'शुकशुकाट' रणनिती

रिझव्‍‌र्ह बँकेने ५ मार्च रोजी येस बँकेच्या  खात्यातून ५० हजारांहून अधिक रक्कम काढण्यास तसेच इतर व्यवहारांवरही निर्बंध घातले होते.  आता निर्बंध हटवल्यानं खातेदारांना अधिक रक्कम काढता येणार आहे तसेच बँकेची डिजिटल सेवाही पूर्ववत होणार आहे. 

दिल्ली सरकारच्या सूचनेनंतरही शाहिन बागमधील आंदोलन कायम

येस बँकेच्या पुनरूज्जीवनासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकडून पुनर्बांधणी योजना तयार करण्यात आली होती. या पुनर्बांधणी योजनेला गेल्याच आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. नव्या आराखड्यानुसार स्टेट बँक त्या बँकेचे ४९ टक्के भागभांडवल संपादित करणार आहे. ऍक्सिस बँक येस बँकेत  ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. एचडीएफसी बँकेनेही येस बँकेत १००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कोटक महिंद्रा बँकही येस बँकेत ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 

इराणला गेलेल्या २५४ भारतीयांना कोरोनाची लागण