पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर ED च्या कार्यालयात, चौकशी सुरु

राणा कपूर

येस बँक प्रकरणी तपास यंत्रणांनी कारवाईला वेग आणला आहे. लुक आऊट नोटीस जारी केल्यानंतर बँकेचे संस्थापक राणा कपूर अंमलबजावणी संचालनालयात (ईडी) कार्यालयात पोहोचले आहेत. शुक्रवारी त्यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. रात्री उशिरा त्यांच्या अनेक ठिकाणांवर ईडीच्या पथकांनी छापे टाकण्यात आले होते. 

VIDEO : १०० दिवसांत काय केले १११ सेकंदात पाहा, शिवसेनेचा खास

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. (डीएचएफएल) दिलेल्या कर्जाप्रकरणी त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा त्यांचा जबाबही नोंदवला होता. डीएचएफएलला दिलेले कोट्यवधींचे कर्ज नंतर बुडाले ते एनपीएमध्ये बदलले होते. 

Mumbai: Rana Kapoor, #YesBank founder has been taken to Enforcement Directorate office for questioning. More details awaited. pic.twitter.com/IvjtSaWpEm

— ANI (@ANI) March 7, 2020

दरम्यान, येस बँकेला वाचवण्यासाठी आरबीआयकडून प्रयत्न केले जात आहेत. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी खातेधारकांना घाबरण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. एक महिन्याच्या आत बँकेचे पुनर्गठन केले जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने येस बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.  

VIDEO : ... आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक

एसबीआय येस बँकेचे ४९ टक्के शेअर्स खरेदी करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर २४५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचीही योजना आहे. एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनीही सध्या खातेधारकांच्या पैशाला कोणताच धोका नसून तो सुरक्षित असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.