पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राणा कपूर यांनी एका पेंटिंगसाठी प्रियांका गांधींना दिले होते २ कोटी

राणा कपूर आणि प्रियांका गांधी

येस बँक संकटात आल्यानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्याकडून तब्बल दोन कोटींना एक पेंटिंग खरेदी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या मुद्यावरुन काँग्रेसला लक्ष्य केलंय.  

कमलनाथ यांच्या राज्यात 'ऑपरेशन लोटस'ची तयारी?

मालवीय म्हणाले की, काही वर्षांपूर्वी राणा कपूर यांनी एम एफ हुसैन यांनी साकारलेले माजी पंतप्रधान राजीव गांधींचे पेंटिंग खरेदी केले होते. या पेंटिंगसाठी त्यांनी प्रियांका गांधी यांना २ कोटी रुपये मोजले होते. यावर काँग्रेस प्रवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रियांका गांधी यांनी एम हुसैन यांनी काढलेले राजीव गांधी यांचे पेंटिंग राणा कपूर यांना विकल्याचे त्यांनी मान्य केले आहे. हा व्यवहार चेकच्या माध्यमातून करण्यात आला होता. त्यासाठी करही भरला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. निरर्थक मुद्दे उकरुन नाहक आरोप करु नका, असेही त्यांनी मालवीय यांना सुनावले.    

औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकला : इम्तियाज जलील

मालवीय यांच्या ट्विटनंतर काँग्रेसने त्यांच्यावर पलटवारही केला. संकटात सापडलेली येस बँक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या अनेक कार्यक्रमात प्रायोजकाच्या भूमिकेत होती. येस बँकेने मोदींच्या अनेक कार्यक्रमाचे आयोजनात सहभागी असायची. मोदींनी अनेकवेळा राणा कपूर यांचे कौतुकही केले आहे, असा दावा करत काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. येस बँक संकटात सापडल्यानंतर ईडीने राणा कपूर यांच्या घरावर छापेमारी केली होती. यावेळी त्यांच्याकडे काही महागड्या पेंटिंगस ही आढल्या होत्या. याचीही ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. 

या वादानंतर राणा कपूर यांनी खरेदी केलेल्या पेंटिंगसंदर्भात दोन फोटो  सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका फोटोमध्ये माजी राजीव गांधींचे चित्र दिसते. तर एका फोटोमध्ये एमएफ हुसैन आणि राजीव गांधी एका पेंटिंगसह दिसत आहेत.