पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुस्तीपटू बबिता फोगटने वडिलांसह भाजपमध्ये केला प्रवेश

बबिता फोगटने भाजपमध्ये केला प्रवेश

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इनकमिंग सुरुच आहे. आज क्रीडा जगतातील आणखी दोन जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महिला कुस्तीपटू बबिता फोगट आणि तिचे वडील महावीर फोगट यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. स्वत: महावीर फोगट यांनी या वृत्ताला दुजोरा दिला होता. दिल्लीत केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

हरयाणा विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्यामुळे बबिता आणि महावीर फोगट या दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे हरयाणामध्ये पक्ष मजबुत होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, बबिता फोगट ही हरयाणा पोलिस दलामध्ये निरीक्षक पदावर कार्यरत होती. तिने या पदाचा राजीनामा दिला आहे. तर महावीर फोगट हे दुष्‍यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षामध्ये आहेत. ते जननायक जनता पक्षाच्या क्रीडा विभागाचे प्रमुख आहेत. 

मुकेश अंबानींनी केली जिओ फायबरची घोषणा, ५ सप्टेंबरला लाँच

कॉमनवेल्थ गेम्समध्ये बबिता फोगटने दोन सुवर्ण पदक आणि एक रौप्य पदक जिंकले होते. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम - ३७० रद्द केल्यानंतर बबिताने त्याचे जोरदार समर्थन केले होते. याबाबत तिने ट्विट देखील केले होते. कलम ३७० हटवल्यामुळे काश्मीरमधील दहशतवाद संपेल आणि काश्मीर विकासाच्या दिशेने वाटचाल करेल, असं तिने ट्विटमध्ये म्हटले होते. 

पुणे-बंगळुरु मार्गावर ८ दिवसांनंतर जड वाहतूक सुरु