पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हवाई दलाच्या बेपत्ता AN 32 विमानाचे अवशेष सापडले

प्रातिनिधिक छायाचित्र

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील 'एएन ३२' या बेपत्ता विमानाचे काही अवशेष अरुणाचल प्रदेशमध्ये मिळाले आहेत. भारतीय हवाई दलाचे एमआय १७ हेलिकॉप्टरच्या साह्याने या भागात शोधकार्य सुरू होते. त्यावेळी लिपोपासून उत्तरेकडे १६ किलोमीटरवर अंदाजे १२ हजार फूट खोलीवर हे अवशेष दिसून आले. हे विमान ८ दिवसांपू्र्वी बेपत्ता झाले होते. त्यामध्ये ८ कर्मचाऱ्यांसह १३ प्रवासी होते.

आसाममधील जोरहाटमधून गेल्या सोमवारी दुपारी १२.२७ मिनिटांनी या विमानाने उड्डाण केले. ते अरुणाचल प्रदेशमधील मेचूकाच्या दिशेने निघाले होते. उड्डाण केल्यानंतर साधारणपणे ३५ मिनिटांनी विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला. मेचूकापासून ७० किलोमीटर अंतरावर असतानाच विमानाचा संपर्क तुटला. यानंतर भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर्स आणि विमानांच्या साह्याने बेपत्ता विमानाचा शोध घेण्यात येतो होता. हवाई मार्गाने शोध घेतला जात असताना दुसरीकडे काही सैनिक घनदाट जंगलामध्येही विमानाचा शोध घेत होते. यासाठी नौदलाची एक तुकडी आणि इस्रोच्या उपग्रहाचीही मदत घेण्यात आली होती. अखेर मंगळवारी या विमानाचे काही अवशेष सापडले आहे. 

विमानात एकूण ८ कर्मचारी होते. तर पाच प्रवासी त्यातून प्रवास करीत होते. विमानातील या सर्वांचे काय झाले, याचीही शोध घेतला जात आहे, असे हवाई दलाने स्पष्ट केले आहे.