पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

५१ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या विमानाचे अवशेष मिळाले

हवाई दलाच्या विमानाचे अवशेष

भारतीय हवाई दलाच्या ५१ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पिती जिल्ह्यातील पर्वतरांगांमध्ये सापडले आहेत. हवाई दलाचे एएन १२ बीएल ५३४ हे विमान ७ फेब्रुवारी १९६८ रोजी रोहतंग पासजवळून बेपत्ता झाले होते. त्यावेळी विमानात सुरक्षा दलाचे तब्बल १०० जवान होते.

धुळ्याजवळ भीषण अपघात; बसला कंटेनरची धडक, १५ जण जागीच ठार

या विमानाचे अवशेष याआधीही काहीवेळा सापडले आहेत. पण यंदा पहिल्यांदाच विमानाचे महत्त्वाचे आणि मोठ्या प्रमाणातील अवशेष सापडले आहेत. यामध्ये एरो इंजिन, इलेक्ट्रिक सर्किट, इंधन टाकी, कॉकपीट दरवाजा, एअर ब्रेक एसेंब्ली यांचा समावेश आहे. याच विमानातून प्रवास करीत असलेल्या शिपाई बेली राम यांचा मृतदेह सन २००३ मध्ये सापडला होता. हिमालय गिर्यारोहण संस्थेच्या सदस्यांना हा मृतदेह मिळाला होता. त्यानंतर ९ ऑगस्ट २००७ मध्ये लष्कराच्या गिर्यारोहकांच्या चमूला या ठिकाणी तीन मृतदेह मिळाले होते. १ जुलै २०१८ रोजी याच ठिकाणी आणखी एका सैनिकाचा मृतदेह मिळाला होता. त्यावेळी विमानाचे काही अवशेषही मिळाले होते.

'..तरी मोदींच्या हिटलशाहीविरोधात लढा सुरुच राहणार'

५१ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष शोधण्यासाठी यावर्षी २६ जुलैला एक विशेष गिर्यारोहण मोहिमही आयोजित करण्यात आली होती. १३ दिवसांच्या शोधानंतर या मोहिमेतील गिर्यारोहकांना बेपत्ता विमानातून प्रवास करणाऱ्या जवानांच्या वस्तू सापडल्या होत्या, असे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.