पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... तर दिल्लीत काँग्रेस पक्ष सत्तेत असता, मिलिंद देवरांचे प्रत्युत्तर

मिलिंद देवरा

आधी काँग्रेस सोडा आणि मग दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे कौतुक करा, अशी टीका करणाऱ्या काँग्रेस नेते अजय माकन यांना पक्षातील त्यांचे सहकारी मिलिंद देवरा यांनी उत्तर दिले आहे. आम आदमी पक्षाशी आघाडी करण्याचे सल्ले देण्यापेक्षा तुम्ही जर दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत शीला दीक्षित यांनी केलेल्या कामांचा निवडणूक प्रचारात वापर केला असता तर आज काँग्रेस दिल्लीत सत्तेत असती, असा टोला मिलिंद देवरा यांनी लगावला आहे.

भारताच्या विकासदराच्या अंदाजात मूडीजकडून आणखी कपात

या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे की, दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शीला दीक्षित यांनी करून ठेवलेल्या कामाला कमी लेखण्याचा कधीच प्रश्न येत नाही. ती तर तुमची खासियत. अर्थात बदलायचे ठरवले तर अजूनही उशीर झालेला नाही. आपशी आघाडी करण्याचे सल्ले देत बसण्यापेक्षा तुम्ही जर शीला दीक्षित यांनी सत्तेत असताना केलेल्या कामांचा प्रचारात वापर केला असता तर आज दिल्लीत काँग्रेस सत्तेत असती.

लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाशी आघाडी करण्याचा शक्यता होती. दोन्ही पक्षांमध्ये प्राथमिक स्वरुपात चर्चाही झाली होती. हाच धागा पकडून मिलिंद देवरा यांनी अजय माकन यांच्यावर टीका केली.

'इंदुरीकरांचे कीर्तन जनप्रबोधनासाठी, एका वाक्यानं वाईट ठरवू नका'

तत्पूर्वी, दिल्लीचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ट्विटरच्या माध्यमातून कौतुक करणारे काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांच्यावर त्यांच्या पक्षातील त्यांचे सहकारी अजय माकन यांनी टीका केली होती. इतकेच नाही तर आधी पक्ष सोडा मग अरविंद केजरीवाल यांचे कौतुक करा, या शब्दांत अजय माकन यांनी मिलिंद देवरा यांना फटकारले होते.